२८०१ बालकांच्या एका पालकाचा तर ११४ जणांच्या आईवडील दोघांचा मृत्यू

मुंबई : करोनामुळे राज्यातील २९१५ बालकांनी आपल्या पालकांना गमावल्याची दुर्दैवी  बाब समोर आली आहे. त्यापैकी ११४ बालकांच्या आई आणि वडील दोघांचाही करोनामुळे मृत्यू झाला असून २८०१ बालकांच्या एका पालकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या पाहणीत समोर आली आहे. या मुलांना राज्य सरकारतर्फे  आर्थिक आधार देण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकू र यांनी के ली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

करोनामुळे अनेक बालके  अनाथ झाल्याचे माहिती महिला व बालविकास विभागाच्या लक्षात आले. त्यावर राज्यातील सर्व जिल्ह्यांत याबाबत पाहणी करण्याचा आदेश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकू र यांनी दिला होता. त्यानुसार के लेल्या पाहणीत वरील बाब स्पष्ट झाली. तर ३७५ बालकांचे मातृछत्र हरपले असून २४२६ बालकांचे पितृछत्र हरपले आहे. ही सर्व माहिती शुक्रवारी महिला व बालविकास विभागाने आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. पालक  गमावलेल्या २९१५ पैकी सर्वाधिक ५०७ बालक भंडारा जिल्ह्यातील असून त्यानंतर सोलापूर २३४ व औरंगाबाद २३३ बालकांचा समावेश आहे. आईवडील दोघांना गमावलेल्या ११४ बालकांपैकी सर्वाधिक १३ बालक हे औरंगाबादमधील आहेत.

करोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या कृती गटातील डॉक्टरांचा आणि महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणावा, यामध्ये बालकांना करोनापासून कशापद्धतीने सुरक्षित ठेवता येईल याचे मार्गदर्शन करावे असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी दिले.

करोनामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक मृत्यू पावले किंवा एक पालक मृत्यू पावला अशा बालकांबाबत विभागाने धोरण निश्चित करावे यामध्ये मुलांच्या संगोपनापासून शिक्षणापर्यंतचे लाभ त्यांना कसे देता येतील याची माहिती देण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अनाथालये व बालकांशी निगडीत इतर संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या १८ ते २३ वयोगटातील मुला-मुलींसाठी राज्याचे स्वतंत्र धोरण असावे. त्यांना कौशल्य विकासाचे विविध प्रशिक्षणे देऊन स्वावलंबी करणे या माध्यमातून केले पाहिजे, अशी मागणी ठाकूर यांनी के ली.

‘अनाथ मुलांचा शोध घेऊन तातडीने मदत करा’

नवी दिल्ली : करोनामुळे भारतासारख्या मोठ्या देशातील किती मुले अनाथ झाली असतील याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही, असे निरीक्षण शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले, अशा अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना मदत करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले. न्यायालयाकडून मिळणाऱ्या आदेशाची प्रतीक्षा न करता या लहान मुलांची तातडीने काळजी घ्या, असा आदेश न्यायालयाने राज्य, जिल्हा प्रशासनाला दिला आहे. आपापल्या जिल्ह्यातील अशा अनाथ मुलांचा शोध घ्या आणि त्यांच्याबाबतची माहिती शनिवारी सायंकाळपर्यंत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करा, असा आदेशही  सुटीकालीन पीठाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

अनाथ मुलांना आर्थिक मदत

करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ मुलांच्या नावाने राज्य सरकारने ५ लाख रुपयांची मुदत ठेव करावी आणि त्यातून येणारे व्याज मुलांना द्यावे. तसेच एक पालक गमावलेल्या मुलांचा समावेश बाल संगोपन योजनेत करून त्यांना दरमहा २५०० रुपये मदत मंजूर करावी, अशी मागणी आम्ही के ली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच याबाबतचा प्रस्ताव  मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल, अशी यशोमती ठाकू र यांनी दिली.