25 February 2021

News Flash

मुंबईत रुग्णवाढ वेगाने

मुंबईतील रुग्णवाढीचा दर डिसेंबरनंतर घसरला होता. त्यानंतर तो ०.१२ टक्क्यांवर स्थिर झाला होता.

संग्रहीत

चेंबूर, वांद्रे, मुलुंड व अंधेरीत सर्वाधिक रुग्णवाढ

मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असतानाच अचानक फे ब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून करोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. १ फे ब्रुवारीला ३२८ पर्यंत असलेली मुंबईतील रुग्णसंख्या आता दैनंदिन एक हजाराच्या जवळ पोहोचली आहे. त्यातही वांद्रे पश्चिाम, चेंबूर, मुलुंड, घाटकोपर, वडाळा, अंधेरी पश्चिाम, कु र्ला, ग्रॅन्ट रोड या भागात रुग्णवाढ अधिक आहे. या भागात दररोज प्रत्येकी ३५ ते ४० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत, तर अंधेरी पश्चिाम भागात दरदिवशीच्या रुग्णांची संख्या ७० पर्यंत पोहोचली आहे.

फेब्रवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आटोक्यात असलेली रुग्णसंख्या १० फे ब्रुवारीपासून वाढू लागली आणि रुग्णवाढीचा दरही हळूहळू वाढू लागला. १० फे ब्रुवारीला ५५८ रुग्णांची नोंद झाली आणि त्यानंतर दररोज रुग्णांची संख्या सतत वाढतच असल्याचे आढळून आले आहे. मात्र त्यातही सुरुवातीला पूर्व उपनगरात रुग्णवाढीचा दर जास्त होता. त्यातही मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, कु र्ला या परिसरात रुग्णवाढ जास्त होती. मात्र नंतर वांद्रे, ग्रँन्ट रोड, अंधेरी, जोगेश्वारी, भांडूप या भागांतही रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली. सध्या झोपडपट्ट्यांऐवजी इमारतींमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर डिसेंबरनंतर घसरला होता. त्यानंतर तो ०.१२ टक्क्यांवर स्थिर झाला होता. मात्र हा दर वाढून आता सरासरी ०.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र मुंबईतील काही विभागांमध्ये हा दर ०.३० टक्क्यांच्याही पुढे आहे. त्यात वांद्रे पश्चिाम, चेंबूर आणि मुलुंडचा समावेश आहे. त्याचबरोबर कु र्ला, वडाळा, ग्रॅन्ट रोड, अंधेरी, जोगेश्वारी पश्चिाम भाग येथेही रुग्णवाढीचा दर जास्त आहे. मात्र करोनाच्या सुरुवातीच्या काळात वरळी, धारावी, मालाड, देवनार, भायखळा येथे रुग्णवाढ जास्त होती. तिथे यावेळी रुग्णांची संख्या कमी आहे.

दरम्यान, सध्या मोठ्या प्रमाणावर इमारतींमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. घरातील एक व्यक्ती बाधित झाल्यानंतर कु टुंबातील सर्वांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. चाचण्यांच्या अहवालात कु टुंबातील अन्य सदस्यही बाधित असल्याचे आढळून येत आहे, परंतु त्यांना लक्षणे नसतात. त्यामुळे रुग्णांची संख्या जास्त असली तरी त्यात लक्षणे असलेले रुग्ण कमी आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 12:21 am

Web Title: corona virus incirse in mumbai akp 94
Next Stories
1 मुखपट्टीविना फिरणाऱ्या २२ हजार जणांवर बडगा
2 न शिकताच परीक्षा द्या
3 रुग्णवाढीचा विषाणूच्या उत्परिवर्तनाशी संबंध नाही!
Just Now!
X