News Flash

मुंबईत ८३० नवे रुग्ण, ११ मृत्यू

बुधवारी ८३० नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख १८ हजारांपुढे गेली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : बुधवारी मुंबईत ८३० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्यांपर्यंत खाली आला आहे.

बुधवारी ८३० नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख १८ हजारांपुढे गेली आहे.  सध्या १४ हजार ९०७ उपचाराधीन रुग्ण आहेत.  धारावीत सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस एकही नवीन रुग्ण आढळला नाही. मात्र बुधवारी एका रुग्णाची नोंद झाली.  धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत असून सध्या के वळ १० उपचाराधीन रुग्ण आहेत.

ठाणे जिल्ह्यात ५०३ करोना रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी ५०३ करोना रुग्ण आढळून आले. तर ३७ जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील ५०३ करोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली १३३, ठाणे ११७, नवी मुंबई ७४, मिरा भाईंदर ६५, ठाणे ग्रामीण ६४, बदलापूर २४, अंबरनाथ ११, उल्हासनगर आठ आणि भिवंडीत सात रुग्ण आढळून आले. ३७ मृतांपैकी बदलापूर १७, नवी मुंबई सहा, ठाणे पाच, अंबरनाथ तीन, कल्याण-डोंबिवली तीन, मिरा भाईंदर आणि उल्हासनगरमध्ये एकाचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 12:55 am

Web Title: corona virus infection corona death patient akp 94 4
टॅग : Corona
Next Stories
1 हेल्मेटसक्ती झुगारणाऱ्या १६ लाख दुचाकीस्वारांना दंड
2 मुंबईसह कोकणात मुसळधार
3 ‘मानव- वन्यजीव सहजीवन विकसित करण्यासाठी काम करावे’
Just Now!
X