News Flash

मुंबईत आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

दिवसभरात ११,१६३ करोनाबाधित, २५ मृत्यू

मुंबई : मुंबईमधील रुग्णवाढीने रविवारी नवा उच्चांक गाठला असून रविवारी तब्बल ११ हजार १६३ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्ण वाढीचा दर १.६१ टक्क्य़ांवर पोहोचला असून रुग्णदुपटीच्या कालावधीत कमालीची घसरण झाली आहे. बाधित रुग्णांच्या शोधार्थ पालिके ने रविवारी ५१ हजारांहून अधिक चाचण्या के ल्या.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार, पालिका आणि अन्य यंत्रणांनी करोना संसर्गाविरोधात पुन्हा एकदा कंबर कसली आहे. रविवारी मुंबईतील ११ हजार १६३ जणांना बाधा झाल्यामुळे करोनाबाधितांची संख्या चार लाख ५२ हजार ४४५ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले १३ पुरुष आणि १२ महिलांचा रविवारी करोनामुळे मृत्यू झाला. यापैकी १८ जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत ११ हजार ७७६ मुंबईकरांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले तब्बल पाच हजार २६३ जण रविवारी करोनामुक्त झाले. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या तीन लाख ७१ हजार ६२८ वर पोहोचली आहे. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये ६८ हजार ०५२ रुग्ण उपचार घेत आहेत.

पालिकेकडून दिवसभरात ५१,३१९ चाचण्या

करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने रविवारी तब्बल ५१ हजार ३१९ चाचण्या केल्या असून त्यापैकी ११ हजार १६३ रुग्ण बाधित झाले आहेत. आतापर्यंत ४२ लाख ६९ हजार १७५ चाचण्या करण्यात आल्या  आहेत. मुंबईतील करोना दुप्पटीचा कालावधी ४२ दिवसांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ८२ टक्क्य़ांवर घसरले आहे. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील तब्बल ३० हजार १३९ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले आहे. यापैकी ९९० संशयित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 1:40 am

Web Title: corona virus infection corona patient in mumbai akp 94
Next Stories
1 करोनाबाधितांच्या सेवेसाठी ‘विभागीय नियंत्रण कक्ष’
2 पोलिसांच्या लाचखोरीच्या डायरीत नोंदी?
3 ‘पोक्सो’अंतर्गत खटला वर्षभरात निकाली
Just Now!
X