News Flash

परप्रांतीय पुन्हा मुंबईत!

फेब्रुवारीत करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे मार्चच्या अखेरीपासून राज्य सरकारने मुंबईसह राज्यभर निर्बंध लागू केले.

परराज्यांतून मुंबईत रेल्वेने आलेल्या प्रवाशांची प्रत्येक स्थानकात नोंद करून करोना चाचणी करण्यात येत आहे.

शहरातील रुग्णसंख्या घटू लागल्याने परराज्यांतून ओघ; दोन महिन्यांत २८ लाख जण परत

मुंबई : करोना रुग्णांची संख्या ओसरू लागल्याने तसेच करोनाविषयक निर्बंध हटू लागल्यामुळे परराज्यांतून मुंबईकडे पुन्हा कामगारांचा ओघ सुरू झाला आहे. फेब्रुवारीमध्ये करोनाची दुसरी लाट आल्यानंतर हजारो परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतले होते. मात्र, मे आणि जून या दोन महिन्यांत मुंबई महानगरात आलेल्या मेल, एक्स्प्रेसमधून २८ लाख प्रवासी दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक प्रवासी मध्य रेल्वेवरून दाखल झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

फेब्रुवारीत करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे मार्चच्या अखेरीपासून राज्य सरकारने मुंबईसह राज्यभर निर्बंध लागू केले. त्यामुळे धास्तावलेले कामगार आपल्या कुटुंबांसह आपापल्या गावी रवाना झाले. परराज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन रेल्वेने विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या.  टाळेबंदी शिथिल होताच बिघडलेले अर्थचक्र  पुन्हा सुरळीत होण्याची चिन्हे दिसताच परराज्यात गेलेले मजूर, कामगार पुन्हा मुंबई महानगराकडे येऊ लागले आहेत.  मार्च व एप्रिल महिन्यात परराज्यातून मुंबई महानगरात येणाऱ्यांची संख्या कमी होती. परंतु मे महिन्यापासून या संख्येत हळूहळू वाढ झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. परराज्याबरोबरच महाराष्ट्रातल्या विविध विभागातूनही प्रवासी येत होते. परंतु त्याचे प्रमाण फारच कमी असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवर दर दिवशी सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण येथे उत्तरेकडून व दक्षिणेकडून गाड्या येतात. दरभंगा, वाराणसी, गोवा, उत्तराखंड, के रळ, भुवनेश्वार, हैदराबाद, बंगळूरु यासह पश्चिम रेल्वेवरील जोधपूर, अमृतसर, गुजरात, नवी दिल्ली, गोरखपूर, मुझफ्फरपूर इत्यादी विभागातून मुंबई सेन्ट्रल, वांद्रे टर्मिनसपर्यंत गाड्या दाखल होतात. मे व जून या दोन महिन्यात पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमधून मुंबई महानगरात एकू ण ७ लाख ८ हजार ९५६ जण, तर मध्य रेल्वेच्या गाड्यांमधून परराज्यातून महाराष्ट्रात २८ लाख २६ हजार २२६ जण दाखल झाले आहेत. यात मुंबई विभागात सुमारे २१ लाख प्रवासी आले आहेत. मे महिन्यात पश्चिम रेल्वेवर मुंबई विभागात दर दिवशी १५ हजार १०२ प्रवासी आणि जून (१ जून ते १० जूनपर्यंत) महिन्यात २४ हजार प्रवासी येत होते.

काटेकोर तपासणी, चाचण्या

करोनाचा संसर्ग वाढल्याने के रळ, गोवा, गुजरात, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड या संवेदनशील भागातून महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. हा निर्णय १७ एप्रिल २०२१ला घेण्यात आला. त्यानंतर १ मे ला उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालही या संवेदनशील भागाच्या यादीत आले. या संवेदनशील भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या वेळेपासून ४८ तासांमध्ये करोना चाचणी बंधनकारक के ली. संशयित प्रवाशांची आरटीपीसीआर किं वा अ‍ँटीजन चाचणी करण्यात येते. तरीही मोठ्या संख्येने प्रवासी येतच राहिले. संशयित प्रवाशांची आरटीपीसीआर किं वा अ‍ँटीजन करण्यात येते. याशिवाय महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या प्रवाशांचेही थर्मल स्क्रि निंग होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 1:20 am

Web Title: corona virus infection corona patient mumbai restrictions vaccine akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 लसीकरणाला वेग
2 नद्यांमधील कचरा अडवण्यासाठी तीन वर्षांत पुन्हा खर्च
3 राणीच्या बागेत झाडे सुरक्षित
Just Now!
X