मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्येत दररोज चढउतार होत असून दैनंदिन रुग्णसंख्या ६०० ते ८०० च्या दरम्यान स्थिर आहे. गुरुवारी ७८९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १० रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी ३५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. बाधितांचे प्रमाण मात्र २.२१ टक्के  इतके च होते. गुरुवारी ७८९नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या सात लाख २४ हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात ५४२ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत सहा लाख ९१ हजारांहून अधिक  म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या १४ हजार ८१० झाली आहे.  

 ठाणे जिल्ह्यात  ४६२ बाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ४६२ करोना रुग्ण आढळून आले, तर १५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ४६२ करोना रुग्णांपैकी नवी मुंबई १३७, ठाणे १३१, कल्याण डोंबिवली ७२, मीरा-भाईंदर ५२, ठाणे ग्रामीण ४०, बदलापूर १४, अंबरनाथ नऊ, भिवंडी पाच आणि उल्हासनगरमध्ये दोन रुग्ण आढळून आले.