मुंबई :  मुंबईत गुरुवारी ६६६ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्यांपर्यंत खाली आला आहे. बाधितांचे प्रमाण अडीच टक्क्यांच्या खाली आहे.

गुरुवारी ६६६ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख १९ हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात ७४१ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ८६ हजारांहून अधिक  म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे.  सध्या १४ हजार ८०७ उपचाराधीन रुग्ण आहेत. बुधवारी २९ हजार ३०९ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २.२७ टक्के  नागरिक बाधित आढळले.

आतापर्यंत ६७ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.  मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ७३४ दिवसांवर पोहोचला आहे.

धारावीत सहा उपचाराधीन  धारावीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होत असून सध्या के वळ ६ उपचाराधीन रुग्ण आहेत.

ठाणे जिल्ह्यात ४६९ बाधित

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी ४६९ करोना रुग्ण आढळले. तर ३७ जणांचा मृत्यू झाला.  नवी मुंबई १११, ठाणे ११०, कल्याण-डोंबिवली ८९, मिरा-भाईंदर ५९, ठाणे ग्रामीण ४९, अंबरनाथ २७, बदलापूर १६, उल्हासनगर ६आणि भिवंडीत २ रुग्ण आढळले.