मुंबई: राज्यात शुक्रवारी ९ हजार ७९८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर १४ हजार ३४७ रुग्णांनी करोनावर मात के ली.  गेल्या २४ तासात १९८ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या एक लाख ३४ हजार ७४७ आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ११५३ रुग्णांची नोंद झाली, सांगलीत १०१९, पुणे ग्रामीण ९८१, सातारा ६८५, पुण्यात ४७० नव्या बाधितांची नोंद झाली.

मुंबईत ७६२ बाधित

मुंबईत शुक्रवारी ७६२ रुग्णांची नोंद झाली, तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्यांपर्यंत खाली आला आहे.  सध्या १४ हजार ८६० उपचाराधीन रुग्ण आहेत. गुरुवारी ३० हजार ४४७ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २.५० टक्के नागरिक बाधित आढळले. रुग्ण दुपटीचा कालावधीही ७३४ दिवसांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्यात ४१७  जणांना करोना

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ४१७ नवे बाधित आढळून आले आहेत. तर, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई ९३, ठाणे ८२, कल्याण-डोंबिवली ७९, मिरा भाईंदर ६५, ठाणे ग्रमीण ५७, बदलापूर १८, अंबरनाथ १२, भिवंडी सात व उल्हासनगरमध्ये चार रुग्ण आढळून आले आहेत.