News Flash

मुंबईत २४ तासांत ३,६७२ करोनारुग्ण, ७९ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात रविवारी २ हजार ७४४ करोना रुग्ण आढळून आले.

मुंबई : मुंबईमधील रुग्ण दुपटीच्या कालावधीने रविवारी सरासरी शंभर दिवसांवर उसळी घेतली, तर करोना वाढीचा दर ०.६६ टक्क्यांवर घसरला.  मुंबईत गेल्या २४ तासांत ३,६७२ जणांना करोनाची बाधा झाल्याची नोंद झाली, तर ७९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील  एकूण करोनाबाधितांची संख्या सहा लाख ५६ हजार २०४ वर पोहोचली. ठाणे जिल्ह्यात रविवारी २ हजार ७४४ करोना रुग्ण आढळून आले. तर ४२ जणांचा मृत्यू झाला.

राज्यात ५६,६४७  नवे रुग्ण

राज्यात रविवारी दिवसभरात  ५६ हजार ६४७ नवीन बाधितांची नोंद झाली तर ६६९ जणांना मृत्यू झाला. दिवसभरात ५१ हजार ३५६ जणांनी करोनावर मात केली. सध्या  सहा लाख ६८ हजार ३५३  रुग्ण उपचाराधीन आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 1:13 am

Web Title: corona virus infection corona positive patient in mumbai akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 लाखो घरकामगार महिला लाभापासून वंचित
2 महाराष्ट्रात एप्रिलमध्ये मृतांच्या संख्येत २५ टक्के वाढ
3 एमके सीएलतर्फे  ‘आयटीत मराठी’ उपयोजन
Just Now!
X