मुंबई   :  राज्यात गेल्या २४ तासात  करोनाच्या १०,६९७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ३६० जणांचा मृत्यू झाला. विदर्भ, मराठवाड्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत मात्र रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात सध्या १ लाख ५५ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे १८,३५०, मुंबई १५,७९८, कोल्हापूर १६,५२०, ठाणे १५,८०१ रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात मुंबई ७३३, पुणे जिल्हा ८२९, पुणे शहर ३८९, सातारा ७९०, नगर ६१७, सोलापूर ५३१, रत्नागिरी ५२०, सिंधुदुर्ग ६०३, सांगली ९०९, कोल्हापूर १४७१ नवे रुग्ण आढळले.

ठाणे जिल्ह्यात शनिवारी ४३२ करोना रुग्ण आढळून आले, तर २३ जणांचा मृत्यू झाला. ठाणे ११२, कल्याण-डोंबिवली १०२, ठाणे ग्रामीण ६६, नवी मुंबई ६०, मिरा भाईंदर ४५, अंबरनाथ २१, बदलापूर १६, उल्हासनगर सहा आणि भिवंडीत चार  रुग्ण आढळून आले.

मुंबईत ७३३ रुग्णांचे नव्याने निदान

शहरात नव्याने निदान होणारे रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांतील तफावत कमी झाली आहे. शनिवारी ७३३ रुग्णांचे नव्याने निदान झाले असून ७३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत रुग्णसंख्येसह मृतांची संख्याही कमी होत आहे. शहरात शनिवारी १८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात ६० वर्षावरील नऊ रुग्ण आहेत, तर ४० ते ६० वयोगटातील पाच रुग्णांचा समावेश आहे. ४० वर्षाखालील ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात रुग्णदुपटीचा कालावधी ६३३ दिवसांवर गेला आहे.  शनिवारी शहरात २९,१७४ चाचण्या झाल्या असून यातून ७३३ रुग्णांचे निदान झाले आहे. शहरात  सध्या १५,७९८ रुग्ण सक्रि य आहेत. मुंबईतील एकू ण बाधितांची संख्या ७,१५,८७९ झाली असून मृतांची संख्या १५,१६४ वर गेली आहे.