News Flash

करोनामुक्तांचे प्रमाण ९५ टक्क्यांवर

मुंबईतील करोनामुक्त रुग्णांची संख्या ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

संग्रहीत

राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट

मुंबई : करोनाच्या उच्चाटनासाठी शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या २४ तासांत तीन हजार ३९ रुग्णांनी या आजारावर मात के ली, तर दोन हजार ९१० नवीन बाधितांची नोंद झाली असून ५२ जणांचा मृत्यू झाला. राज्यभरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या आता ५१ हजार ९६५ पर्यंत खाली आली आहे. पुण्यात सर्वाधिक १५ हजार ८८७, मुंबईत सहा हजार ९६६, ठाण्यात नऊ हजार ६०८, सोलापूर जिल्ह्यात एक हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत दिवसभरात ५७१ रुग्णांची नोंद

मुंबईतील करोनामुक्त रुग्णांची संख्या ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णसंख्येत घट झाली आहे. शनिवारी ५७१ रुग्णांची नोंद झाली असून ८ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील करोनाची स्थिती नियंत्रणात असून रुग्णवाढीचा सरासरी दर ०.२१ टक्क्यांवर स्थिर आहे. रुग्णदुपटीचा सरासरी कालावधी तब्बल ३९२ दिवसांपर्यंत पोहोचला आहे. दैनंदिन रुग्णांत लक्षणे नसलेल्यांची संख्या अधिक आहे. सध्या केवळ ३७५ रुग्ण गंभीर स्थितीत आहेत. शनिवारी ५७१ रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३,०२,२२३ झाली. आतापर्यंत २ लाख ८३ हजारांहून अधिक (९४ टक्के) रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यात ३७३ नवे रुग्ण : ठाणे जिल्ह्यात शनिवारी ३७३ करोनाबाधित आढळले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख ४९ हजार १८२, तर मृतांची संख्या ६ हजार ५३ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 1:56 am

Web Title: corona virus infection corona vaccine corona patient decrease number of patients akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कुर्ला परिसरात मंगळवार आणि बुधवारी पाणीपुरवठा बंद
2 कुलसचिवांच्या नियुक्तीचा फेरविचार करा!
3 मेट्रो रेल्वेगाडी २७ जानेवारीला मुंबईत
Just Now!
X