|| जयेश शिरसाट
मोहम्मद अली रोडवरील घाऊक बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी; खरेदी-विक्री व्यवहार तेजीत
मुंबई : करोना महासाथीत यंदाची दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी होणार, अशी भीती या उद्योगाशी जोडलेल्या व्यावसायिकांना होती. मात्र मुंबईतल्या घाऊक बाजारपेठेत फटाक्यांचे खरेदी-विक्री व्यवहार तेजीत सुरू झाले आहेत. मोहम्मद अली रोडवरील फटाक्यांच्या घाऊक बाजारपेठेत शुक्र वारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह नाशिक, पुणे, रत्नागिरीतील किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांनी फटाके विकत घेण्यासाठी गर्दी के ली होती.
शहर, राज्यातील करोना संसर्गाचा फैलाव आटोक्यात येत असतानाच जगातील काही देशांत महासाथीची दुसरी लाट धडकण्याची भीती व्यक्त होत आहे. श्वसन यंत्रणेवर हल्ला करणारी ही महासाथ पुन्हा उसळू नये यासाठी फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचे आवाहन समाजमाध्यमांवरून जोर धरते आहे. मात्र या आवाहनाचा परिणाम तूर्त तरी मुंबईच्या घाऊक बाजारपेठेत दिसलेला नाही.
गणेशोत्सव आटोपल्यावर किरकोळ विक्रेत्यांकडून घाऊक व्यापाऱ्यांकडे दिवाळीच्या हंगामासाठी फटाक्यांची मागणी सुरू होते. दसऱ्यानंतर बाजारपेठेतली ही लगबग वाढू लागते आणि दिवाळी दोन ते तीन आठवड्यांवर असताना व्यापार शिगेवर असतो. यंदा करोनामुळे ग्राहकवर्ग दिवाळीत विशेषत: फटाक्यांवर खर्च करण्याच्या मन:स्थितीत असेल का, हा प्रश्न फटाके उत्पादकांपासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत साऱ्यांनाच पडला होता. त्यामुळे गणेशोत्सव आटोपल्यानंतर फटाक्यांच्या घाऊक बाजारपेठेत मरगळ होती. मात्र नवरात्रीदरम्यान करोना संसर्गाचा फै लाव उतरंडीला लागल्याची चिन्हे दिसू लागताच घाऊक बाजारपेठेतील व्यवसायाला चालना मिळू लागली.
दिवाळीच्या मुहूर्तावर करोनाच्या संकटातून बाहेर पडू शकू , ही चाहूल दिलासादायक आहे. हा आनंदही दिवाळीच्या निमित्ताने साजरा होईल, असा विश्वास फटाक्यांचे घाऊक विक्रेते आणि मुंबई अॅण्ड ठाणे डिस्ट्रिक्ट फायरवक्र्स डीलर्स वेल्फे अर असोसिएशनचे महासचिव मिनेष मेहता यांनी व्यक्त के ला. सिवाकासीतील उत्पादक, मुंबई किं वा अन्य शहरांतील बड्या घाऊक विक्रेत्यांशिवाय असंख्य किरकोळ किं वा हंगामानुसार वस्तू विकणाऱ्यांचा उदरनिर्वाह फटाके विक्रीवर अवलंबून आहे. आता करोना उतरंडीवर असल्याने विविध वस्तूंच्या बाजारपेठेस अनुकू ल वातावरण तयार होत आहे. त्या आशेवर किरकोळ विक्रेते फटाक्यांची खरेदी करत आहेत, असे मेहता यांनी सांगितले.
मोहम्मद अली रोडवरील घाऊक विक्रेत्यांकडे पुणे जिल्ह््यातून फटाके विकत घेण्यासाठी आलेल्या किरकोळ विक्रेत्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट किमतीच्या फटाक्यांची मागणी के ली. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिक फटाके विकत घेणार, असा विश्वास त्याने व्यक्त के ला.
‘फटाक्यांची खरेदी नेहमीप्रमाणे होईल’
याच वर्षी फटाके व्यवसायावर संकट आहे असे नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांत ऐन दिवाळीत पाऊस होता. फटाके विक्रीच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले नव्हते. आर्थिक मंदी होतीच. शिवाय फटाक्यांऐवजी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल जास्त होता. या वर्षी करोनाचे सावट होते. मात्र दसऱ्यापासून अन्य वस्तूंच्या बाजारपेठा ग्राहकांनी फु लू लागल्या आहेत. साधारण २ नोव्हेंबरनंतर म्हणजे पगार होताच फटाक्यांची खरेदी नेहमीप्रमाणे होईल, असा अंदाज फटाके व्यावसायिक नवीन छावडा यांनी व्यक्त के ला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 31, 2020 12:28 am