News Flash

धूम्रपान करणाऱ्यांसाठी करोना अतिधोकादायक

टाटा स्मारक रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कर्करुग्णांपैकी धूम्रपान करणारे आणि न करणारे यांचा तुलनात्मक अभ्यास रुग्णालयाने केला.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये मात्र फुप्फुसे आधीच कमकुवत असतात आणि करोना संसर्गाने ती अधिक कमजोर होतात.

|| शैलजा तिवले

टाटा स्मारक रुग्णालयाचा अहवाल

मुंबई : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना करोना संसर्गामुळे गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आणि अशा रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही दुप्पट आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना करोनाचा धोका अधिक असल्याचा निष्कर्ष टाटा स्मारक रुग्णालयाने के लेल्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

टाटा स्मारक रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कर्करुग्णांपैकी धूम्रपान करणारे आणि न करणारे यांचा तुलनात्मक अभ्यास रुग्णालयाने केला. त्यात मुंबईसह देशभरातील रुग्णांचा समावेश आहे. सातत्याने आणि बऱ्याच काळापासून धूम्रपान केल्यामुळे या रुग्णांमधील फुप्फुसांवर आधीच परिणाम झालेला असतो. करोना संसर्ग झाल्यास प्रामुख्याने फुप्फुसांवर परिणाम होतो. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींची फुप्फुसे सक्षम असल्यामुळे संसर्ग झाल्यानंतर औषधोपचारांनी  असे रुग्ण बरे होतात. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये मात्र फुप्फुसे आधीच कमकुवत असतात आणि करोना संसर्गाने ती अधिक कमजोर होतात. त्यातून गुंतागुत अधिक वाढते, अशी माहिती टाटा स्मारक रुग्णालयाचे संचालक डॉ. सी.एस.प्रमेश यांनी दिली. कर्करुग्ण धूम्रपान करत असल्यास करोना संसर्गानंतर त्यांच्यावर गंभीर दुष्परिणामांची शक्यता बळावते. त्यामुळे धूम्रपानाचे व्यसन सोडविण्यासाठी समुपदेशन केले जाते, असे डॉ. प्रमेश यांनी सांगितले.

दुष्परिणाम काय? ’धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत धूम्र्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये संसर्गाची तीव्रता अधिक वाढते. त्यातही ६५ वर्षांवरील रुग्णांना सर्वाधिक धोका असतो.

  • अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागते. या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लावण्याचे आणि श्वसनयंत्रणेवर ठेवण्याचे प्रमाणही अधिक आहे.
  • या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. धूम्र्रपान न करणाऱ्या आणि लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका सुमारे दीड टक्के असतो.
  • धूम्र्रपान करणाऱ्या रुग्णांमध्ये तो सुमारे तीन टक्के असतो, असे डॉ. प्रमेश यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 1:32 am

Web Title: corona virus infection extremely dangerous for smokers akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 कठीण काळात गरजूंना अन्नआधार 
2 लस घोटाळ्यातील गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास
3 उद्यापासून पूर्वनोंदणीशिवाय लस
Just Now!
X