News Flash

होळी, धूलिवंदनावर करोनाचे सावट

सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये यासाठी पोलिसांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

ठाण्यातील कोळीवाडा परिसरातील होळीला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. (छाया- दीपक जोशी)

नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून कारवाई

मुंबई : यंदा होळी धूलिवंदनावर करोनाचे सावट आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर पालिके ने होळी आणि धूलिवंदन हा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे. तसेच आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पालिके च्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके  तयार करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.

होळी, धुळवडीला सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात येत आहे. इमारती किंवा सोसायटीच्या आवारात, खासगी व सार्वजनिक जागेत सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिके ने दोनच दिवसांपूर्वी तसे आदेश जाहीर के ले आहेत. मात्र धुळवडीला सार्वजनिक ठिकाणी होणारी  गर्दी लक्षात घेऊन पालिकेने निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात पाच पथके  तयार के ली आहेत. ही पथके  फिरतीवर राहतील व तपासणी करतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. एखाद्या ठिकाणी नियमभंग होतो आहे असे आढळले तर समज दिली जाईल. मात्र त्यानंतरही लोकांनी ऐकले नाही तर पोलिसांची मदत घेतली जाईल व कारवाई के ली जाईल, असाही इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे संसर्ग रोखण्यासाठी होळीनिमित्त नागरिक एकत्र येण्याच्या शक्यतेने शहरात सर्वत्र पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त ठेवली जाणार असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.  सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करू नये यासाठी पोलिसांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत.

पोलिसांकडून वस्त्या, सोसायटीमध्ये फिरून नागरिकांना यासंबंधी आवाहन केले आहे. सध्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोसायट्यांमध्येही सार्वजनिकरीत्या होळीचा सण साजरा करता येणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नागरिकांना खासगीत होळी पूजन करता येईल. मात्र त्या ठिकाणी चारपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

साधेपणाने होळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन करोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 2:05 am

Web Title: corona virus infection holi festival corona patient akp 94
Next Stories
1 नाट्य परिषदेची नियामक मंडळ सभा रद्द केल्याने सदस्यांची निदर्शने
2 अवैध धंद्यांवर कठोरकारवाई करा!
3 भंडारा दुर्घटनेनंतरही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव
Just Now!
X