News Flash

मुंबईत करोनाचे ३६७ नवे रुग्ण

मुंबईत मंगळवारी २८ हजार ४९८ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ९७ लाख ६९ हजार ९५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Coronavirus destroy Brazilian viper venom study claims

मुंबई : मुंबईत मंगळवारी करोनाचे ३६७ नवे रुग्ण आढळले, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ४०८ रुग्ण करोनामुक्त झाले. मुंबईत आतापर्यंत एकू ण रुग्णसंख्या ७ लाख ३५ हजार ७७० झाली आहे. तर ७ लाख १२ हजार ५७० जण करोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ४ हजार ६९६ उपचाराधीन रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के  आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १२८६ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईत मंगळवारी २८ हजार ४९८ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ९७ लाख ६९ हजार ९५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ३८ इमारती प्रतिबंधित आहेत.

राज्यात ३५३० बाधित

राज्यात दिवसभरात ३५३० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली व ५२ मृत्यू झाले. राज्यात ३६८५ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ४९ हजार ६९१ इतकी आहे. गेल्या २४ तासांत रायगड येथे ५९, नाशिक ७६, अहमदनगर ८७०, पुणे ३७२, पुणे शहर १८५, पिंपरी-चिंचवड १४९, सोलापूर २४४, सातारा ३०१, सांगली १७०, रत्नागिरी ६३, उस्मानाबाद ६५, बीड ६२ इतक्या रुग्णांची नोंद झाली.

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी १९७ करोना रुग्ण आढळून आले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीत ६१, ठाणे ५३, नवी मुंबई ४३, मीरा भाईंदर १२, अंबरनाथ १०, बदलापूर १०, उल्हासनगर ४ रुग्ण आढळून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 1:25 am

Web Title: corona virus infection mumbai corona patient akp 94
टॅग : Corona,Corona Vaccine
Next Stories
1 मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या मार्शलला मारहाण
2 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची लवकरच अंमलबजावणी
3 नाट्य परिषदेच अध्यक्षपद नेमके कोणाकडे?
Just Now!
X