05 April 2020

News Flash

करोनामुळे नात्यांची जवळीक वाढली!

 ‘सुट्टी असली तरी सगळे आपापल्या कामात, बाहेर असतात.

 

एकत्र खेळ खेळणे, छंद जोपासण्यासाठी वेळेचा सदुपयोग

मुंबई : राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी ही अनेकांसाठी कौटुंबिक संमेलनाची ठरत आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र खेळ खेळणे, छंद जोपासणे, एकत्र येऊन घरातील कामे करण्यात वेळ घालवत आहेत. कुटुंबाला, स्वत:ला वेळ देता येत नव्हता, एकमेकांशी संवाद कमी होत होता, यासाठी या संचारबंदीचा सदुपयोग करणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

रोजच्या धावपळीत अगदी सुट्टीच्या दिवशीही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असण्याचे क्षण दुर्मीळ झाले आहेत. आठवडाभर पोटापाण्यासाठी धावपळ आणि सुट्टीच्या दिवशीही खरेदी, आप्तांच्या भेटीगाठी, कधी समारंभ यात दिवस संपतो. मात्र सर्व कुटुंबाने एकत्र, एकमेकांच्या सोबतीने दिवस सत्कारणी लावण्याची संधी संचारबंदीने दिली आहे.

‘सुट्टी असली तरी सगळे आपापल्या कामात, बाहेर असतात. सर्व कुटुंबाने एकत्र दिवस घालवण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. खूप दिवसांनी एकत्र गप्पा मारणे, खेळणे, एकत्र काम करणे यात दिवस गेला. पुढील आठ दिवस घरी एकत्र काय करता येईल याचे नियोजन केले. अनेक पुस्तके वाचायची राहिली आहेत. ती वाचणार आहे. मुलींना काही गोष्टी शिकवायच्या आहेत. त्यांच्याकडून काही शिकायच्या आहेत,’ असे ठाण्यातील मंजिरी कार्लेकर यांनी सांगितले.

एरवी मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. तीदेखील त्यांच्या शाळा, मित्र यांत गुंतलेली असतात. पण आता मिळालेल्या वेळ मुलांशी गप्पा मारण्यात घालवणार, असे सौरभ सावंत यांनी सांगितले.

‘नाण्यांचा संग्रह खूप दिवसात नीटनेटका लावायचा होता, तो वेळ मिळाल्यामुळे लावून झाला. त्यात दोन तास कसे गेले ते कळले नाही. पुढच्या आठ दिवसांत हाच दिनक्रम चालू ठेवायचा हे मात्र अजून स्वीकारता येत नाहीये. पण जमेल याची खात्री मात्र वाटते. आता मुलींकडून ओरिगामी शिकायचे ठरवले आहे, असे प्रसाद कार्लेकर यांनी सांगितले. ‘आई-बाबांना स्कॉटलंड यार्ड खेळायला शिकवले. खूप दिवसांनी एकत्र गप्पा मारल्या. मजा आली,’ अशा भावना नीती आणि निधी कार्लेकर यांनी व्यक्त केल्या.

‘मुलगा, सून, नातू असे सगळे घरी असण्याचे कारण हे वाईट असले तरी त्यांचे कायम घरी असणे सुखावह आहे. नातवाला कंटाळा आल्यावर जुने फोटोंचे अल्बम काढले. नातवाला त्याच्या वडिलांचे लहानपणचे फोटो, समारंभांचे फोटो बघून मजा वाटत होती. त्यानिमित्ताने अनेक जुन्या आठवणी निघाल्या. त्यावर विचार करायलाही एरवी वेळ नसतो. त्यामुळे गप्पा रंगल्या. घरी आपापले काम सांभाळून एकत्र वेळ काढणे नक्कीच कठीण नाही,’ अशा भावना पाल्र्यातील वसंत जोशी यांनी व्यक्त केल्या.

‘घरी सगळे एकत्र असत नाहीत. प्रत्येकाच्या जाण्यायेण्याच्या वेळा वेगळ्या असतात. त्यामुळे रोज एकमेकांसमोर असलो तरी खूप गप्पा होत नाहीत. घरी कामाला येणाऱ्या मावशींना सुट्टी दिली आहे. त्यामुळे घरातील कामे आम्ही मुलांच्या मदतीने केली. मुलांना बाहेर जाता येत नसल्यामुळे कंटाळा आला. मग त्यांच्याशी खेळलो. मुलांबरोबर सापशिडी, ल्यूडो खेळताना मजा आली. खूप वर्षांनंतर असे खेळ खेळले

-वैष्णवी सावंत, वैष्णवी सावंत, मुलुंड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 12:11 am

Web Title: corona virus infection relationships grow closer akp 94
Next Stories
1 दुकानांत मास्कशिवाय प्रवेश नाही
2 कल्याण-डोंबिवलीत ३१ जणांवर गुन्हे
3 डोंबिवलीत आढळला करोनाचा पहिला रुग्ण
Just Now!
X