मुंबई: गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांना ५ सप्टेंबर रविवारपासून करोना चाचणीलाही सामोरे जावे लागणार आहे. दोन लसमात्रा किं वा ७२ तास आधी करोना चाचणी अहवालाची अट शासनाने कायम ठेवली आहे. यापैकी काही नसल्यास एसटी, रेल्वे स्थानकाबाहेर किं वा गावागावांत करोना चाचणी करणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे, एसटी, जलमार्गे येणाऱ्यांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे.

एसटी बस ज्या ठिकाणाहून सुटणार त्या ठिकाणी प्रवाशांची माहिती संकलित करून चालक-वाहक तालुक्याच्या एसटी आगारात जमा करतील. ही माहिती रोज तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  खासगी बसेसमधून आलेल्या प्रवाशांची माहिती संकलित करून ती  दिली जाणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा, वाहतूक पोलीस, आमदार यांती बैठक बोलावली आहे. त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.