१२ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल; पंचस्तरीय विभागणीनुसार सूट

मुंबई : राज्यातील करोना रुग्णसंख्या घटल्याने राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करून सध्याचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार नागपूरसह १२ जिल्ह्यांमधील निर्बंध बहुतांशी रद्द झाले असले तरी मुंबई, पुणे आणि ठाण्यात मात्र फारसा दिलासा मिळालेला नाही. मुंबईत सामान्यांच्या लोकल प्रवासावरील बंदी कायम आहे.

मुंबई, ठाण्यात मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. मात्र, दुकाने खुली ठेवण्याची वेळ ४ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे तर हॉटेल्समध्येही क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दोन दिवसांच्या गोंधळानंतर राज्य शासनाने शुक्र वारी मध्यरात्री एकच्या सुमारास नवीन मार्गदशक तत्त्वे लागू केली. त्यानुसार करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायू खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे निर्बंध किती शिथिल करायचे याचा निर्णय दर आठवड्याला घेतला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले.

बससेवा १०० टक्के क्षमतेसह

लोकल प्रवास हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित राहणार असला तरी बस मात्र १०० टक्के  प्रवासी क्षमतेसह धावणार आहेत. मात्र, बसमध्ये उभ्याने प्रवास करण्यास असलेली मनाई कायम ठेवण्यात आली आहे. नव्या निकषांनुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी पाचनंतर संचारबंदी लागू होईल.

मुंबई तिसऱ्या गटात का?

ज्या विभागात करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण (पॉझिटिव्हिटी दर) ५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान आहे आणि प्राणवायूच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक खाटा रुग्णांनी व्यापलेल्या आहेत. अशा शहरांचा समावेश तिसऱ्या गटात करण्यात आला आहे. मुंबईत प्राणवायूच्या खाटांपैकी के वळ ३२.५१ टक्के  खाटा भरलेल्या आहेत. मात्र करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५.५६ टक्के  असल्यामुळे मुंबईचा समावेश तिसऱ्या गटात करण्यात आला आहे.

खासगी कार्यालयांतील  उपस्थितीबाबत संभ्रम

तिसऱ्या गटातील शहरांमध्ये सरकारी आणि  खासगी कार्यालये ५० टक्के  उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, खासगी कार्यालयांबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई महापालिके ने शनिवारी जाहीर के लेल्या नियमावलीमध्ये खासगी कार्यालयांच्या उपस्थितीबाबत निर्णय जाहीर के लेला नाही.

दोन महिन्यांपासून लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने निकषांनुसार मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश तिसऱ्या गटात करण्यात आला असून त्यामुळे काही प्रमाणात बंधने कायम राहणार आहेत. सर्व सामान्यांना लोकल प्रवास करण्यास असलेली बंदी कायम राहील तसेच मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृहदेखील बंदच राहणार आहेत. मात्र, दुकाने खुली ठेवण्याची वेळ ४ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे तर हॉटेल्समध्येही क्षमतेच्या पन्नास टक्के  ग्राहकांना बसण्यास परवानगी देण्यात आली आहे.

निर्बंध शिथिल करताना मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई-विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महापालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तर या महापालिका क्षेत्रांबाहेरील क्षेत्राला एक वेगळा प्रशासकीय घटक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ३४ जिल्हे आणि १२ महापालिका अशी स्वतंत्र विभागणी करण्यात आली आहे.

शिथिलीकरणाचे स्तर

पहिला…

करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या आणि प्राणवायू खाटांवर २५ टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण दाखल असलेल्या जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता तेथील जनजीवन पूर्ववत सुरू होईल. या टप्प्यात या जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवण्यात येणार आहेत.

दुसरा… 

करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान प्राणवायू खाटा व्याप्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्व दुकाने खुली ठेवण्यास मुभा. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने तसेच सरकारी, खासगी कार्यालये, उद्याने, क्रीडांगणे सुरू होतील. मॉल, उपाहारगृहे, सिनेमागृहे, बैठकांची सभागृहे क्षमतेच्या ५० टक्के  सुरू ठेवण्यास परवानगी. लग्नासाठी मंगल कार्यालयांच्या क्षमतेच्या ५० टक्के  किं वा जास्तीतजास्त १०० लोकांना परवानगी असेल. व्यायामशाळा, के शकर्तनालय, स्पा येथे पूर्वनोंदणीने ५० टक्के  क्षमतेने परवानगी असेल. अंत्यविधीसाठी उपस्थितीची मर्यादा नाही. आंतरजिल्हा प्रवासाला मुभा असेल, मात्र स्तर- ५मध्ये जायचे असेल तर ई-पास आवश्यक.

तिसरा…

बाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५ते १० टक्क््यांच्या दरम्यान आणि प्राणवायूच्या खाटा ४० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांनी व्याप्त असतील असे जिल्हे आणि महापालिकांचा समावेश होतो. अत्यावश्यक सेवेतील आणि इतर सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत खुली राहतील. अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. मॉल्स, सिनेमागृहे बंदच राहतील. उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. घरपोच सेवा सुरू राहील. सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग याला सकाळी ५ ते ९ परवानगी असेल. खासगी कार्यालये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के उपस्थितीत सुरू राहतील. मैदानी खेळ सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहतील. चित्रपट, मालिका चित्रीकरण स्टुडिओत (बबलमध्ये) करण्यास परवानगी, मात्र गर्दी जमेल अशा चित्रीकरणाला परवानगी नाही. सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांना सभागृह क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार परवानगी असेल. लग्न सोहळ्यांना ५०, तर अत्यंसंस्काराला २० लोक उपस्थित राहू शकतील. बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना संध्याकाळी ४ वाजेपर्यंत काम करण्यास मुभा. या सर्व जिल्ह्यांत जमावबंदी लागू राहणार असून संध्याकाळी ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू राहील. व्यायामशाळा, के शकर्तनालय, स्पा पूर्वनोंदणीने ५० टक्के  क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू राहील. आंतर जिल्हा प्रवासास मुभा मात्र टप्पा पाचमधील जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास बंधनकारक असेल.

चौथा 

बाधितांचे साप्ताहिक प्रमाण १० ते २० टक्क्यांदरम्यान आणि प्राणवायू खांटाचा वापर ६० टक्क्यांपेक्षा अधिक असेल अशा जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांत संचारबंदी राहील. येथे अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली राहतील. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने, मॉल्स, थिएटर बंदच राहतील. उपाहारगृह केवळ घरपोच सेवेसाठी सुरू राहतील. के शकर्तनालये, व्यायामशाळा ५० टक्के क्षमतेने वातानुकूलित यंत्राचा वापर न करता संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. या ठिकाणी के वळ लसीकरण झालेल्यांनाच परवानगी असेल. सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सोमवार ते शुक्रवारी सकाळी ५ ते ९दरम्यान परवानगी असेल. शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मैदानी खेळ सोमवार ते शुक्रवारी सकाळी ९ वाजेपर्यंत खेळता येतील, तर बंदिस्त खेळांना बंदी असेल. चित्रीकरण के वळ बबलमध्ये करता येईल, गर्दीचे चित्रीकरण करता येणार नाही. सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न सोहळ्यास २५, तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांच्या उपस्थितीस परवानगी. सार्वजनिक बसगाड्या क्षमतेच्या ५० टक्के आसनक्षमतेने सुरू राहतील. ई-कॉमर्समध्ये के वळ जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणास परवानगी असेल. उद्योग व्यवसाय ५० टक्के  क्षमतेने सुरू ठेवता येतील.

पाचवा  

बाधितांचे साप्ताहिक प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि प्राणवायूच्या खाटा ७५ टक्के  पेक्षा अधिक व्याप्त अससेल्या ‘रेड झोन’मधील जिल्ह्यांत संचारबंदी कायम असेल. नागरिकांना सबळ कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव असेल. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ४ पर्यंत सुरू असतील. अन्य दुकाने बंदच राहतील. शनिवार-रविवार के वळ वैद्यकीय सेवा आणि संबंधित दुकाने सुरू राहतील.

अत्यावश्यक सेवेची व्याप्तीवाढ

रुग्णालये, चाचणी केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध केंद्रे, औषध निर्मिती कंपन्या इतर वैद्यकीय सुविधा देणारे तसेच त्याचे उत्पादन आणि वितरण करणारे, त्यांची वाहतूक करणारे आदींचा समावेश अत्यावश्यक सेवेत असेल. त्याचप्रमाणे लशीचे वितरण, जंतुनाशके , मुखपट्टी, वैद्यकीय उपकरणे आणि इतर कच्चा माल यालाही आवश्यक सेवा म्हणून गृहीत धरले जाईल. तसेच पशुवैद्यकीय सेवा, जनावरे आणि पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने, वन विभागाद्वारे घोषित केलेले वन विभागाचे काम, विमानसेवेशी सबंधित सर्व घटक, किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, दूध डेरी, बेकरी, मिठाईचे दुकान यांचाही समावेश अत्यावश्यक सेवेत असेल. त्याचप्रमाणे शीतगृह आणि वखार सेवा, सार्वजनिक वाहतूक-यात विमान, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस, स्थानिक प्रशासनातर्फे पावसाळ्यापूर्वीची कामे, स्थानिक प्रशासनाच्या सर्व सार्वजनिक सेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा, सेबीशी संबंधित सर्व कार्यालये, दूरध्वनी सेवेसाठी लागणारी सेवा, मालवाहतूक, पाणीपुरवठा सेवा, कृषी संबंधित सर्व कामे, सर्व वस्तूंची आयात-निर्यात, ई-कॉमर्स फक्त आवश्यक सेवा आणि सामान, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप आणि पेट्रोलची संबंधित उत्पादक, सर्व मालवाहतूक सेवा आदींचा समावेश असेल.

जिल्हानिहाय स्तर

स्तर- १ सर्व निर्बंध रद्द

नागपूर, अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, यवतमाळ

स्तर – २ बहुतांशी निर्बंध रद्द हिंगोली, नंदुरबार

स्तर- ३ दुकाने सायंकाळी ४ पर्यंत खुली ठेवण्यास मुभा. अन्य व्यवहार बंदच.

मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, वर्धा, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, ,उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, वाशिम.

स्तर- ४  दुकाने सायंकाळी ४ पर्यंत खुली, अन्य व्यवहार बंदच.

पुणे, बुलढाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग.

स्तर- ५ सोमवार ते शुक्र वार सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली. कडक निर्बंध  या स्तरात सध्या तरी एकही जिल्हा नाही.

काय बंद, काय सुरू?

  • अत्यावश्यक गटातील दुकाने दररोज दुपारी ४ पर्यंत सुरू.
  • अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत. शनिवार-रविवार बंदच.
  • मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंदच.
  • उपाहारगृहे सोमवार ते शुक्रवार ५० टक्के  क्षमतेने दुपारी ४ पर्यंत, त्यानंतर घरपोच सेवा.
  • सार्वजनिक मैदाने, उद्याने, वॉकिं ग ट्रॅक सकाळी ५ ते ९ सुरू.
  • व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर ४ पर्यंत, ५० टक्के  उपस्थिती. वेळ घेऊन येणाऱ्यांना परवानगी, वातानुकू लित यंत्रणा बंद
  • चित्रपट, मालिका चित्रीकरण स्टुडिओत किं वा गर्दी होणार नाही अशा ठिकाणी संध्याकाळी ५पर्यंत.
  • सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवारी चारपर्यंत ५० टक्के  क्षमतेने.
  • लग्न सोहळे ५० टक्के  उपस्थितीत, तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना परवानगी.
  • बस प्रवास १०० टक्के  क्षमतेने, उभे राहून प्रवास करण्यावर बंदी.
  • सर्व प्रकारच्या ऑनलाइन खरेदीला पूर्णपणे मुभा.

लोकल प्रवासबंदी कायम

निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार के लेल्या प्रस्तावानुसार मुंबई पालिके ने मुंबई शहर आणि उपनगरासाठीची नियमावली शनिवारी तयार के ली. या नियमावलीत लोकल प्रवासाबाबत काय निर्णय घेणार याक डे नागरिकांचे लक्ष लागले होते. मात्र लोकलवरील सध्या असलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला आहे.