दोन महिन्यांत ६० लाख मात्रा देण्यासाठी पालिकेचा कृती आराखडा

मुंबई : मुंबई महापालिके ने एका बाजूला करोना प्रतिबंधात्मक लसीच्या एक कोटी मात्रा विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असताना दुसऱ्या बाजूला या भव्य लसीकरणासाठी तयारीही सुरू के ली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर मोठ्या संख्येने लसीकरण वाढवण्यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार के ला आहे. साठ दिवसांत ६० लाख मुंबईकरांना लसीची पहिली मात्रा देण्याचे लक्ष्य पालिके ने ठेवले आहे.

करोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी पालिके ने मुंबईकरांसाठी १ कोटी लस मात्रा विकत घेण्यासाठी जागतिक स्तरावरून पुरवठादारांकडून स्वारस्यपत्र मागवले आहे. त्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या लसी उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. त्याकरीता पालिके नेकृती आराखडा तयार के ला आहे. त्याकरीता प्रत्येक विभागात लसीकरण केंद्र वाढवण्यात येणार असून पात्र असलेल्या ६० लाख नागरिकांना दोन महिन्यात पहिली मात्रा देण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सध्या मुंबईत एकूण ३३५ केंद्रावर लस दिली जात आहे. दिवसाला ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे.  एक कोटी लसमात्रा उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येक वॉर्डात दोन याप्रमाणे ४५४ लसीकरण केंद्र सुरू के ले जातील. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल आणि दिवसाला एक लाख लसमात्रा देता येणे शक्य होईल. मुंबईत १८ वर्षांवरील साधारणत: ९० लाख नागरिक लसीकरणास पात्र आहेत. त्यापैकी सध्या ३१ लाख नागरिकांना पहिली मात्रा दिलेली आहे. तर साडे सात लाख नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण के ले आहेत. त्यामुळे उर्वरित ६० लाख नागरिकांना पहिली मात्रा देण्याचे लक्ष्य आहे.

खासगी रुग्णालयांचीही मदत

सध्या खासगी रुग्णालयांमार्फत व्यावसायिक आस्थापना, गृह निर्माण सोसायट्यांना लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही यंत्रणा देखील अधिक सक्षम करण्यात येईल. त्यामुळेही लसीकरणाचा वेग वाढेल, असाही विश्वास काकाणी यांनी व्यक्त केला.