करोनाचा फैलाव रोखण्याासाठी राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न सुरु असताना मुंबईत मात्र अजून एका रुग्णाचा बळी गेला आहे. फोर्टिस रुग्णालयात दाखल असलेल्या ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. करोनाची लक्षणं असल्याने या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र उपचार सुरु असतानाचा शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे रिपोर्ट समोर आले असता त्यांना करोनाची लागण झाली होती हे निष्पन्न झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने कुठेही परदेशात प्रवास केला नव्हता. त्यामुळे त्यांना लागण झाली कशी याचती माहिती मिळवली जात आहे. दरम्यान या व्यक्तीच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही वैद्यकीय तपासणी केली जात आहे. यासोतच राज्यातील मृतांची संख्या नऊ वर पोहोचली आहे.

पुण्यात करोनाचा पहिला बळी
दरम्यान पुण्यात करोनाचा पहिला बळी गेला असून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पुण्यात एकूण ३१ लोक करोनाने बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी सात जणांवर यशस्वी उपचार करुन घरी पाठवण्यात आलं आहे. मात्र आज या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांना २१ तारखेला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तपासणी केले असता करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यांना उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा त्रास होता. आज सकाळी त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus 80 year old patient died in mumbai sgy
First published on: 30-03-2020 at 17:55 IST