लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : करोनाकाळात कर्तव्यावर असताना करोनाची लागण होऊन बेस्टमधील ७६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ५५ जणांच्या वारसांना बेस्ट उपक्र मात अनुकं पा तत्त्वावर नोकरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नियमानुसार संबंधित वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदतही दिल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

करोनाकाळात सुरुवातीपासून बेस्टच्या परिवहन, विद्युतसह अन्य विभागांतील कर्मचारी कार्यरत होते. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना मुंबईबरोबरच कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई, विरार येथूनही बससेवा दिली. त्यासाठी चालक, वाहक कार्यरत होते. तर विद्युत विभागातील कर्मचारीही २४ तास हजर होते. ही सेवा देताना अनेकांना करोनाची बाधा झाली. कार्यरत असताना दोन हजार ९५८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली होती. त्यापैकी दोन हजार ८३४ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. बेस्टमधील अधिकारी, कर्मचारी करोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ९६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शिवाय २१ जणांवर उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे बेस्ट उपक्र माकडून सांगण्यात आले.

करोनाकाळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कु टुंबीयांना ५० लाख रुपये आर्थिक मदत आणि कु टुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ५५ जणांना अनुकंपा तत्त्वावर बेस्टमधील विविध विभागांत नोकरी देण्यात आली आहे. नोकरीसाठी सादर के लेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने अन्य काही जणांना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रि या धिम्या गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले.