काँग्रेस नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी करोनावर मात केली आहे. अशोक चव्हाण यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाची लागण झाल्याने अशोक चव्हाण यांना २५ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण मुंबईतील निवासस्थानी रवाना झाले असून तिथे १४ दिवस क्वारंटाइन राहणार आहेत.

अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाल्याने २४ मे रोजी नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २५ मे रोजी अशोक चव्हाण यांना रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आलं होतं. मुंबईत लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

करोनाची लागण झाल्याच्या एक आठवड्याआझी अशोक चव्हाण मुंबईहून नांदेडला गेले होते. मुंबईतून गेल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. यावेळी त्यांनी आपली करोना चाचणीही करुन घेतली होती. नांदेडमधील रुग्णालयात त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता संसर्ग झाल्याचं निषन्न झालं होतं.