03 December 2020

News Flash

रुग्णसंख्या घटल्याने ६७ टक्के खाटा रिकाम्या

दिवाळीपूर्वी रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होऊ लागल्यामुळे करोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिक्त आहेत.

एकूण १४,४६२ खाटांपैकी ९७३४ खाटा रिक्त आहेत.

करोना उपचार केंद्रात दहा हजार रुग्णशय्या उपलब्ध

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दिवाळीपूर्वी रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होऊ लागल्यामुळे करोना उपचार केंद्रातील तब्बल ६७ टक्के खाटा रिक्त आहेत. एकूण १४,४६२ खाटांपैकी ९७३४ खाटा रिक्त आहेत.

पालिकेच्या करोना उपचार केंद्रात एकूण १४४६२ खाटा उपलब्ध आहेत. त्यात अतिदक्षता विभागाच्या खाटा, कृत्रिम श्वसन उपकरणासह असलेल्या खाटा, प्राणवायूसह असलेल्या खाटा अशा विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा असलेल्या खाटा आहेत. त्यापैकी काही खाटा खासगी रुग्णालयातील तर काही पालिकेच्या रुग्णालयातील आहेत.

पालिकेच्या नियंत्रण कक्षातील खाटांच्या उपलब्धतेबाबतच्या फलकावरील माहितीनुसार, पालिकेकडे सध्या असलेल्या खाटांपैकी ९७३४ खाटा रिक्त आहेत. मे व जून महिन्यात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे खाटा कमी पडू लागल्या होत्या. त्यामुळे रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. म्हणून पालिकेने २४ विभागांमध्ये खाटांच्या उपलब्धतेची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारले होते. त्यात पालिकेच्या व खासगी रुग्णालयातील खाटांची माहिती अद्ययावत केली जात आहे. नोव्हेंबर महिन्यापासून करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे मोठय़ा संख्येने खाटा रिक्त राहत आहेत. त्याचबरोबर ज्या रुग्णांची घरे मोठी आहेत त्यांना गृह अलगीकरणाची परवानगी दिली जात आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने करोना उपचार केंद्रातील खाटा रिक्त राहत आहे. मात्र मुंबईतील ६० टक्के जनता झोपडपट्टय़ांमध्ये राहते त्यामुळे अशा ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढल्यास त्यांना या करोना उपचार केंद्रात दाखल करता येते. मुंबईत एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या केवळ ८९४६ रुग्ण उपचाराधीन असून त्यापैकी ६२११ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर २९३५ रुग्णांना लक्षणे आहेत. तर ६६१ रुग्ण गंभीर स्थितीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:20 am

Web Title: coronavirus corona patients reduced in mumbai dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 चैत्यभूमी दुरुस्तीसाठी २९ कोटींचा निधी
2 दहा वर्षांपासून रखडलेला पुनर्विकास मार्गी
3 दिवाळीमुळे सावरलेल्या बाजाराचे लग्नसराईकडे डोळे
Just Now!
X