10 August 2020

News Flash

CoronaVirus : वसईतील पालिकेचे डीएम पेटिट रुग्णालय सील

रुग्णालयातील दोन परिचारिकांना करोनाची बाधा

संग्रहित छायाचित्र

वसई-विरार महापालिकेचे सर डी एम पेटिट रुग्णालय मंगळवारी प्रतिबंधित करण्यात आले. या रुग्णालयातील दोन परिचारिकांना करोनाची बाधा झाल्यानंतर महापालिकेने हा निर्णय घेतला. या रुग्णालयातील दोन परिचारिकांसह त्यांच्या नातेवाईकांना अलगीकरणात ठेवण्यात आलेलं आहे.

या रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचारी मिळून १६० च्या आसपास रुग्णालयीन कर्मचारी सेवा देत आहेत. रुग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांचे घशाचे  नमुने पाठविण्यात आले आहेत. या रुग्णालयातील सर्व रुग्णांना पालिकेच्या इतर आरोग्य केंद्रात कळविण्यात आलेले आहे रुग्णालयाच्या निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे.

महाराष्ट्रात ३५० आणखी करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या २६८४ झाली आहे. दिवसभरात करोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आज जे १८ मृत्यू झाले त्यातले ११ मृत्यू मुंबईत झाले आहेत. ज्या १८ रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी १२ पुरुष रुग्ण होते आणि सहा महिला आहेत. १८ पैकी ११ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातले आहेत. १८ पैकी १३ रुग्णांना मधुमेह, ब्लड प्रेशर, अस्थमा, हृदयरोग असे विकार होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2020 10:19 pm

Web Title: coronavirus dm petit hospital seal of the municipality of vasai msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 ट्रेनबाबतची अफवा कोणी पसरवली याची चौकशी होणार-अनिल देशमुख
2 “लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही.. परप्रांतीयांनी घाबरु नये”
3 करोनाचा लढा महाराष्ट्र गांभीर्याने लढतो आहे-उद्धव ठाकरे
Just Now!
X