News Flash

नवी मुंबईत करोनामुळे एकाचा मृत्यू; नेरूळमध्ये तरुणाला संसर्ग

राज्यातील रुग्णांचा आकडा आठशेच्या उंबरठ्यावर

संग्रहित छायाचित्र

करोनाची लागण झालेल्या एका ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील करोना बळींची संख्या दोनवर गेली आहे. दुसरीकडं शहरात करोनाचे तीन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाग्रस्त रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे.

नेरूळ परिसरातील ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीला करोना सदृश्य लक्षणं दिसून आली. त्यांनतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचणी रिपोर्टमध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, घणसोलीमध्ये एक आणि नेरूळमध्ये दोन असे दोन नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. नेरूळ येथील एका तरुणाला लागण झाली आहे. हा तरुण सध्या गावी असून, त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यातील रुग्णसंख्या आठशेच्या उंबरठ्यावर –

राज्यातील रुग्णसंख्या ७४८ झाली. मुंबईत रविवारी आढळलेल्या १०३ नव्या रुग्णांपैकी ५५ जणांची तपासणी खासगी प्रयोगशाळांत करण्यात आली होती. त्यांच्या चाचण्यांवर कस्तुरबा रुग्णालयाने रविवारी शिक्कामोर्तब केले. रविवारी मृत्युमुखी पडलेल्या आठ रुग्णांपैकी सहा जणांना दिर्घकालीन आजार होता. या सर्व मृतांचे वय ५२ ते ७७ वष्रे यादरम्यान होते. रविवारी राज्यात करोनाने १३ बळी घेतले. त्यामुळे राज्यातील करोनाबळींची संख्या ४५ वर पोहोचली.

देशातील रुग्णसंख्या ३३७४

गेल्या चोवीस तासांत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ४७२ ने वाढ झाली असून, देशभरात एकूण रुग्णसंख्या ३३७४ वर पोहोचली आहे. देशात एकूण ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण ४.१ दिवस आहे. तबलिग अनुयायांमुळे रुग्णांची संख्या वाढली, अन्यथा रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण ७.४ दिवस इतके राहिले असते, असे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 8:18 am

Web Title: coronavirus in maharashtra one died due to coronavirus infection in navi mumbai bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 एक हजार कर्मचाऱ्यांची अ‍ॅण्टिबॉडी चाचणी
2 प्रतिबंधित क्षेत्रासाठी पालिकेची कार्यपद्धती
3 एन ९५ मास्क, पीपीई विक्री-वितरणावर निर्बंध
Just Now!
X