मुंबई : गेल्या २४ तासांत मुंबईत ५९५ करोनाबाधित आढळले, तर ८३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. शनिवारी नऊ मृतांची नोंद झाली. शहरात रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्य़ांवर पोहोचला असून, सध्या ७६७८ रुग्ण उपचाराधीन आहेत.
ठाणे जिल्ह्य़ात ३७१ नवे रुग्ण
ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ३७१ करोनाबाधित आढळले, तर सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २ लाख ४६ हजार ७०२, तर मृतांची संख्या ६ हजार २१ इतकी झाली आहे. शनिवारी ठाणे पालिका क्षेत्रात १२९, कल्याण-डोंबिवलीत ७९, नवी मुंबई ७६, मीरा-भाईंदर ३७, अंबरनाथ १६, ठाणे ग्रामीण १०, बदलापूर १२, उल्हासनगर ११, भिवंडीत एक रुग्ण आढळला. मृतांमध्ये ठाण्यातील तीन, कल्याण-डोंबिवली दोन, उल्हासनगर आणि नवी मुंबईतील एकाचा सामावेश आहे.
देशात १८,२२२ नवे रुग्ण
’ देशात गेल्या २४ तासांत १८ हजार २२२ करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या एक कोटी चार लाख ३१ हजार ६३९वर पोहोचली आहे.
’ आतापर्यंत एक कोटी ५६ हजार ६५१ जण करोनातून बरे झाले असून, करोनामुक्तांचे प्रमाण शनिवारी ९६.४१ टक्क्य़ांवर पोहोचले, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. देशात सध्या दोन लाख २४ हजार १९० उपचाराधीन रुग्ण असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या २.१६ टक्के इतके आहे.
’ दिवसभरात करोनामुळे आणखी २२८ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ५० हजार ७९८ झाली आहे. देशातील मृत्युदर १.४५ टक्के इतका आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 4:36 am