27 May 2020

News Flash

प्रतिबंधित क्षेत्रांत निर्बंधांची ऐशीतैशी

इमारती सील केल्यानंतरही रहिवाशांचा मुक्तसंचार सुरूच

इमारती सील केल्यानंतरही रहिवाशांचा मुक्तसंचार सुरूच

मुंबई : करोनाचा रुग्ण आढळल्यानंतर खबरदारी  म्हणून मुंबई महापालिकेकडून संबंधित वस्त्या, इमारती ताब्यात घेऊन तेथील रहिवाशांच्या हालचालींवर निर्बंध आणण्यात येत आहे. दोन आठवडय़ांसाठी या इमारतींचा बाहेरील परिसराशी संपूर्ण संपर्क तोडण्यात येतो. असे असले तरी, या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवासी पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांची पाठ फिरताच सर्व निर्बंध पायदळी तुडवत स्वैर फिरताना दिसत आहेत.

भांडुपच्या खिंडीपाडा भागातील दोन वस्त्या पालिके ने ताब्यात घेतल्या किंवा या वस्त्या विलग करण्याची प्रक्रिया सुरू केली. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार येथील विश्वशांती नगर येथे गेल्या आठवडय़ात करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर ही वस्ती महापालिके च्या एस विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आणि पुढील दोन आठवडय़ांसाठी या वस्तीवर कठोर निर्बंध लादण्यात आले. त्यानुसार या वस्तीतून कोणीही बाहेर पडणार नाही, बाहेरची व्यक्ती किं वा वाहन वस्तीत जाणार नाही, हा त्यातील प्रमुख निर्बंध. मात्र दुसऱ्याच दिवशी येथील रहिवाशांनी पालिका, पोलिसांनी येथे बॅरेके ड्स, मोठाल्या चिकटपट्टय़ा किं वा बांबू लावून के लेली नाकाबंदी उचकटली. बॅरेके ड्स, बांबू बाजूला करून या वस्तीतील वाहतूक, ये-जा सुरू झाली.

येथील कोकणेश्वर मित्र मंडळ परिसरातही सोमवारी अशाच प्रकारे पालिके ने कारवाई के ली. तीही टिकू  शकली नाही. पालिके ने भांडुपच्या गुरखा चाळ ही दाट लोकसंख्या असलेली वस्तीही सोमवारी ताब्यात घेतली. मात्र मंगळवार सकाळी येथील जनजीवन नेहमीप्रमाणे, अन्य वस्त्यांप्रमाणे सुरू होते. खिडीपाडय़ातील वस्तीवरील निर्बंध रहिवाशांनी उलथून टाकल्याबद्दल येथील शिक्षणसंस्था संचालक रमेश खानविलकर यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून कळविले होते. इतके च नव्हे तर येथील छायाचित्रे त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवली. त्यानंतर येथे पुन्हा पोलीस बंदोबस्त जोडून देण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या वस्त्या, इमारतींवरील र्निबधांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस बंदोबस्त जोडून दिला जातो. वरळी कोळीवाडा, धारावी किं वा अन्य भागांत महापालिके ने ताब्यात घेतलेल्या वस्त्यांच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. या र्निबधांमुळे आतल्या आत अडकू न पडलेल्या रहिवाशांना दूध, भाजीपाला किं वा अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पोलिसांमार्फत के ला जात आहे. मात्र अनेक ठिकाणी पोलिसांचा पहारा सैलावल्यावर वस्त्यांमधील नागरिक बाहेर भटकताना दिसतात. येथील दुकाने आणि व्यवहार सुरू होतात. बाहेरच्या व्यक्ती मोकाटपणे वस्त्यांमध्ये शिरतात, असे चित्र आहे.

चिंचपोकळी पूर्वेकडील वस्तीत करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर महापालिके ने हा परिसर ताब्यात घेतला. प्रत्यक्षात या वस्तीतील रहिवासी बाहेर भटकताना दिसत आहेत. तसेच या वस्तीत येणाऱ्या एकाच प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त आहे. उर्वरित मार्गावर बंदोबस्त नसल्याने तेथून रहिवाशांची बाहेर ये-जा सुरू आहे. वरळीतल्या जिजामाता नगर येथेही असेच चित्र असल्याच्या तक्रोरी पालिके ला मिळत आहेत.

अखेर पालिके कडून भाजी विक्रीस मनाई

करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या मुंबईतील २४१ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली असून वारंवार आवाहन करून या परिसरात भाजी खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत होते. परिणामी, संसर्ग होण्याचा मोठा धोका लक्षात घेत आता प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये भाजी विक्रीस मनाई करण्यात आली आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रुग्ण आढळणारी इमारत, परिसर प्रतिबंधित करण्यात येत आहेत. आतापर्यंत २४१ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली असून या परिसरातील नागरिकांना अन्य भागात जाण्यास व बाहेरील व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांतील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात यासाठी भाजी विक्रीस परवानगी होती. मात्र भाजी विक्रीच्या निमित्ताने अनेक नागरिक प्रतिबंधित क्षेत्रात घुटमळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेत एका विशेष बैठकीत पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी प्रतिबंधित क्षेत्रात भाजी विक्रीस मनाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 2:16 am

Web Title: coronavirus in mumbai building quarantine in bhandup zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : पूर्ण टाळेबंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा
2 CoronaVirus : कस्तुरबामध्ये करोनाच्या चाचण्यांसाठी सुरक्षा कक्ष
3 CoronaVirus : समाजाची काळजी वाहणाऱ्यांना कुटुंबाची चिंता
Just Now!
X