30 May 2020

News Flash

Coronavirus outbreak : संयम सुटू लागलाय?

टाळेबंदीच्या तीन आठवडय़ांनतर नागरिकांत अस्वस्थता; नागरिकांचे पोलिसांशी खटके

टाळेबंदीच्या तीन आठवडय़ांनतर नागरिकांत अस्वस्थता; नागरिकांचे पोलिसांशी खटके

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुंबईत लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला तीन आठवडे उलटत चालले असताना, तेवढय़ा कालावधीत घरात निमूटपणे बसून राहिलेल्या नागरिकांचा संयम आता सुटू लागलाय की काय, असे दाखवणाऱ्या घटना उजेडात येत आहेत. घराबाहेर पडल्यानंतर हटकणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालण्यापासून त्यांच्यावर दगडफेक करण्यापर्यंतच्या घटनांत वाढ होत आहे.

दोन दिवसांपूर्वी नाक्यावर रेंगाळाणाऱ्या सात ते आठ तरुणांना गस्तीवरील पोलिसांनी हटकले. तेव्हा तरुणांनी पोलिसांवर चक्क दगडफे क के ली. पोलिसांवर दगडफे क करणाऱ्यांना रोखण्याऐवजी परिसरातील रहिवाशांनी आणखी गर्दी के ली आणि हा जमाव पोलिसांविरोधात उभा ठाकला. अखेर अधिकची कु मक मागवून पोलिसांना जमाव पांगवावा लागला. त्यातच या प्रसंगाची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवरून लागलीच फिरू लागल्याने पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि शासकीय अधिकाऱ्याच्या कर्तव्यात लुडबुडीचा गुन्हा नोंदवला.

दक्षिण मुंबईतल्या भेंडीबाजार परिसरात पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. पोलिसांनी दुचाकीस्वाराला अडवून कशासाठी घराबाहेर पडला, याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न के ला. तेव्हा दुचाकीस्वाराने तेथून निसटण्याचा प्रयत्न के ला. त्याच्या दुचाकीला धरून ठेवण्याच्या प्रयत्नात एक पोलीस शिपाई लांबवर फरफटत गेला. दुचाकीस्वार थांबत नाही हे लक्षात येताच शिपायानेच धडपड थांबवली. या प्रकरणी जेजे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

गोवंडीच्या शिवाजी नगर झोपडपट्टीत गस्तीवर असलेल्या दोन शिपायांना तरुणांचा घोळका दिसला. त्यांनी तरुणांना हटकले. तेव्हादेखील या जमावाने हुज्जत घालत लाकडी बांबूने दोन शिपायांना मारहाण के ली. जमावातील दोघांना अटक करण्यात आली तर अन्य तरुणांचा शोध सुरू आहे.

टाळेबंदीची अंमलबजावणी तंतोतंत शक्य आहे, पण जमावबंदीची नाही. नागरिकांना विशेषत: झोपडपट्टीत राहाणाऱ्यांना घरी पिटाळणे किं वा तेथील नागरिक घराबाहेर पडणारच नाहीत अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. हातावर पोट असलेल्यांच्या या वस्त्या. टाळेबंदीमुळे रोजगार सुटलेला. इवलीशी घरे. त्यात राहाणाऱ्यांची संख्या जास्त. कशी त्या घरात दिवसभर राहणार याची जाणीव पोलिसांना आहे. मात्र त्यासोबत प्रतिबंधात्मक उपाय, आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी के ली नाही तर करोनाचा प्रादुर्भाव वाढेल याचीही जाणीव आहे. मधल्यामध्ये पोलीस भरडले जात आहेत, अशी प्रतिक्रि या पूर्व उपनगरातील एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने लोकसत्ताकडे व्यक्त के ली.

तर शहरातल्या काही वस्त्या विशेषत: झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा संयम सुटत चालल्याचा अंदाज काही पेालीस अधिकारी

व्यक्त करतात. काही गोष्टी मनातून किं वा जाणीवेतून के ल्या गेल्या तर परिणामकारक ठरतात. निव्वळ कायद्याचा धाक दाखवून किं वा धाकात र्निबधांची अंमलबजावणी करता येणार नाही, असे मत एका पोलीस अधिकाऱ्यानेच व्यक्त केले.

१५२७ जणांना अटक

करोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जारी करण्यात आलेली टाळेबंदी, जमावबंदीसह अन्य आदेश किं वा र्निबधांचे उल्लंघन करणाऱ्या दोन हजारांहून अधिक व्यक्तींविरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोदवण्यात आले. पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार २० मार्चपासून रविवार रात्री १२ वाजेपर्यंत शहरात १९७० जणांविरोधात १०३९ गुन्हे नोंदवण्यात आले. यापैकी १५२७ जणांना अटक करण्यात आली, २९९ जणांना नोटीस बजावून सोडण्यात आले तर १४४ जणांचा शोध सुरू आहे. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात अवैध स्थलांतर किं वा अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण जास्त होते. हळूहळू ते घटले आणि  जमावबंदी आदेशाची पायमल्ली वाढली. ३२६ अवैध वाहतुकीबद्दल तर ५७० जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल नोंद गुन्हयांची संख्या आहे, असे अशोक यांनी स्पष्ट केले.

रोज नवनवी आव्हाने उभी राहत आहेत. सगळ्यात मोठे आव्हान नागरिकांना एकत्र येऊ न देणे, कुठेही गर्दी होऊ न देणे, हे आहे. ते कायम असून पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

— प्रणय अशोक, पोलीस प्रवक्ते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 2:26 am

Web Title: coronavirus in mumbai citizens clash with mumbai police during lockdown zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुंबईच्या कचऱ्यात ३० टक्क्यांची घट
2 Coronavirus : करोना मृतांचा दफनविधी बडा कब्रस्तानमध्ये
3 coronavirus : मृतदेह बंदिस्त करण्याच्या पिशव्यांचा तुटवडा
Just Now!
X