News Flash

Coronavirus : भाभा रुग्णालयातील कर्मचारी महिलेला करोनाची बाधा

पनवेलमधील करोनाबाधितांची संख्या 22 वर पोहचली

संग्रहित छायाचित्र

मुंबई येथील भाभा रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेला करोनाची बाधा झाली असल्याचे शुक्रवारी रात्री कोरोना चाचणीच्या अहवालानंतर स्पष्ट झाल. संबंधित महिलेवर उपाचार सूरु असून ती पनवेल पालिका क्षेत्रातील कामोठे वसाहतीमधील रहिवासी असल्याने पनवेल पालिका प्रशासनाची तारंबळ उडाली आहे.

भाभा रुग्णालयातील या महिलेच्या तपासणी अहवालात तिला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने पनवेलमधील करोनाबाधितांची संख्या 22 वर पोहचली आहे. पनवेल पालिका प्रशासनाने करोनाची बाधा टाळण्यासाठी आतापर्यंत कळंबोली येथील पार्थनेस्ट आणि खारघर येथील घरकुल सोसायटी या दोन इमारती सील केल्या आहेत. येथे कडेकोट संचारबंदी लागू आहे. पनवेलमधील करोनाबाधितांचा वाढत्या आकड्यामुळे पनवेलकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आणखी वाचा- बदलापूरमध्ये आढळले करोनाचे तीन रुग्ण, पोलिसाच्या पत्नी आणि मुलीला लागण

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रातल्या संख्येच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्या भागात आवश्यकता आहे तिथे लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात येतील असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधी दिला आहे. पोलीस आणि इतर यंत्रणा त्यांचं काम अगदी योग्य पद्धतीने करत आहेत. मात्र आता SRPF अर्थात राज्य राखीव दलाच्या तुकडीलाही पाचारण केलं जाईल. तसंच जे दाटीवाटीचे भाग आहेत तिथे ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 4:30 pm

Web Title: coronavirus infection of corona to bhabha hospital working woman msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : मॉर्निंग वॉकला निघालेल्या 35 जणांवर कारवाई
2 Coronavirus : लॉकडाउनमध्ये वाढदिवसाची पार्टी करणे भाजपा नगरसेवकास भोवले
3 रुग्णालयांनी प्रवेश नाकारल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
Just Now!
X