29 May 2020

News Flash

मोठी बातमी – मास्क न घालता घराबाहेर पडल्यास होणार अटक

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून मास्क बंधनकारक केलं आहे

प्रातिनिधीक छायाचित्र

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून मास्क बंधनकारक केलं आहे. यासंबंधीचा निर्णय महापालिकेकडून जाहीर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे मास्क न घालणाऱ्यांना दंड ठोठावला जाऊ शकतो. तसंच अटकही केली जाऊ शकते. महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काही अभ्यासांमध्ये सोशल डिस्टन्सिंग याशिवाय मास्कचा वापर केल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतरही करोनाचा फैलाव होण्यावर नियंत्रण आणलं जाऊ शकतं असं समोर आलं आहे. यामुळेच सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं प्रवीण परदेशी यांनी सांगितलं आहे.

या निर्णयानुसार मुंबईत सार्वजनिक ठिकाणी रस्ते, रुग्णालय, मार्केट तसंच इतर ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मास्क घालणं बंधनकारक आहे. कितीही महत्त्वाचं कारण असलं तरी मास्क घालणं बंधनकारक आहे. याशिवाय आपल्या खासगी किंवा कार्यलयीन वाहनात फिरतानाही मास्क बंधनकारक असणार आहे. तसंच महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही बैठक, कार्यक्रम तसंच कामाच्या ठिकाणी मास्क बंधनकारक असणार आहे. हे मास्क केमिस्टकडे उपलबध असतील किंवा घऱात धुवून पुन्हा वापरु शकणारे असू शकतील असंही महापालिकेने सांगितलं आहे.

जर एखाद्या व्यक्तीने या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्याला दंड ठोठावला जाऊ शकतो तसंच अटकेची कारवाईही केली जाऊ शकते असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 4:31 pm

Web Title: coronavirus mask compulsion in mumbai bmc sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: संचारबंदी असतानाही मिरा रोड परिसरात नागरिक नाश्ता करायला रस्त्यावर
2 भाजपा नेते किरीट सोमय्यांना मुंबई पोलिसांकडून अटक
3 “धारावी लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे”
Just Now!
X