News Flash

“करोना हा मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी सरकारने आखलेला कट”, फेसबुक पोस्ट करणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीला अटक

ही व्यक्ती कुर्ला येथे वास्तव्यास आहे

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरस हा मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी सरकारने आखलेला कट असल्याचा दावा करणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीला मुंबईत अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती कुर्ला येथे वास्तव्यास आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याने हा दावा केला होता. यावेळी त्याने लोकांना आपली कोणतीही माहिती प्रशासनाला देऊ नका असं आवाहन केलं होतं. यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव शमीम इफ्तेखार खान असून तो कुर्ला पूर्व येथील कुरेशी नगरचा रहिवासी आहे. “त्याने फेसबुक पोस्टमध्ये करोना व्हायरस अस्तित्वात नसून सरकारने एका ठराविक समाजाला टार्गेट करण्यासाठी हा कट आखला आहे असा दावा केला होता. तसंच करोनासी संबंधित सर्व्हेदरम्यान प्रशासनाला कोणतीही माहिती देऊ नका असं आवाहन त्याने लोकांना केला होतं,” अशी माहिती चुनाभट्टी पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. पोलिसांनी शमीम इफ्तेखार खान याला कलम १८८ आणि कलम ५०५ अंतर्गत अटक केली आहे.

गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये कलम १४४ संबंधित अफवा सोशल मीडियावर पसरवत असल्या प्रकरणी २९ लोकांना अटक करण्यात आली होती. चुकीची माहिती प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी गृह मंत्रालायाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून अफवा रोखणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या महिन्यात समाजवादी पक्षाचे नेते रमाकांत यादव यांनी सीएए आणि एनआरसीविरोधातील आंदोलन रोखण्यासाठी केंद्र सरकारने करोनाचा कट आखला असल्याचा दावा केला होता. यावेळी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा किमान एक मीटर अंतर ठेवण्याचा सल्ला मानण्यास नकार दिला होता. आपण करोना रुग्णांची गळाभेट घेण्यास तयार आहोत असं ते म्हणाले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 10:11 am

Web Title: coronavirus mumbai man claims govt conspiracy arrested sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 टाटा कॅन्सर रुग्णालयाने ४० टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या!
2 नवी मुंबईत करोनामुळे एकाचा मृत्यू; नेरूळमध्ये तरुणाला संसर्ग
3 एक हजार कर्मचाऱ्यांची अ‍ॅण्टिबॉडी चाचणी
Just Now!
X