हवेमार्फत पसरणाऱ्या करोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी लोकांनी गर्दीची ठिकाणी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले होते. अनेक देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच काही ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच मुंबई पोलिसांनी एक जनजागृती करणारे एक मजेशीर मीम्स शेअर केले आहे.

मुंबई पोलिसांनी जनजागृती करणारे ट्विट केले आहे. या मध्ये त्यांनी प्रसिद्ध शायर आणि गीतकार राहत इंदौरी मास्क घालून उभे असलेला फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांच्या या फोटोच्या बाजूला ‘जो व्हायरस है वो फैलाने का नाही, बुलाती है मगर जाने का नही’ असे लिहिले आहे. मुंबई पोलिसांचे हे मजेशीर ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. खुद्द राहत इंदौरी यांनी पोलिसांचे हे ट्विट रिट्विट केले आहे.

मुंबई पोलिसांचे हे जनजागृती करणारे ट्विट सोशल मीडियावर अनेक जण शेअर करत आहेत. तसेच अनेक सेलिब्रिटी देखील सॅनेटायझर किंवा साबणाने स्वच्छ हात धूण्यासाठी लोकांन आवाहन करत आहेत.