News Flash

Coronavirus : मुंबईत करोनाचे ५२१ नवे रुग्ण, ७ मृत्यू

रविवारी चाचण्यांची संख्या कमी असल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येतही घट दाखवते.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबईत सोमवारी ५२१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर सात रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी चाचण्यांची संख्या कमी असल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येतही घट दाखवते. रविवारी २६ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी बाधितांचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

मुंबईत एकूण बाधितांची संख्या सात लाख २१ हजारांपुढे गेली आहे. करोना मृतांची एकूण संख्या १५ हजार ३०५ झाली आहे. एका दिवसात ६५८ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत सात लाख ८९ हजारांहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १४ हजार ६३७ उपचाराधीन रुग्ण आहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.०९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ७२० दिवसांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात आणखी ३६३ बाधित

ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी ३६३ करोना रुग्ण आढळून आले, तर १० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील ३६३ करोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली ९६, ठाणे ८६, नवी मुंबई ६९, मीरा-भाईंदर ४४, ठाणे ग्रामीण ३४, बदलापूर १४, अंबरनाथ १०, उल्हासनगर नऊ आणि भिवंडीत एक रुग्ण आढळून आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 2:38 am

Web Title: coronavirus news updates mumbai reports 521 new cases seven deaths zws 70
Next Stories
1 ‘त्या’ मद्यविक्रेत्यांना व्यवसाय करू द्या
2 डेल्टा प्लस विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून ७५०० नमुने
3 गतिमंद मुलाची हत्या करून वृद्धाचा गळफास
Just Now!
X