01 March 2021

News Flash

‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात मंडळाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

संग्रहित छायाचित्र

नरेपार्क, गणेशगल्ली पाठोपाठ लालबाग भागातील आणखी एका प्रसिद्ध चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने गणेशोत्सवाबद्दल अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने यंदा गणेश आगमन सोहळा रद्द केला आहे तसेच मंडपातच गणेशमूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश भक्तांमध्ये ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. आधी विजय खातू ही मूर्ती साकाराचये. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी रेश्मा खातू ‘चिंचपोकळीच्या चिंतामणीची’ सुबक मूर्ती घडवतात.

“यंदा कोरोनो संकटाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द करून चिंतामणीची मूर्ती श्री मंडपातच बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच श्री चिंतामणीचा पाद्यपूजन सोहळा देखील ठराविक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात येईल” अशी माहिती मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांनी दिली. “यंदाचा उत्सव भव्यतेने नाही तर साधेपणाने साजरा करण्यात येईल. मूर्तीच्या उंचीबाबत जे शासन नियम असतील, तशीच मूर्ती घडवण्यात येईल” अशी वासुदेव सावंत यांनी माहिती दिली.

नेरपार्कही साधेपणाने साजरा करणार उत्सव
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नेरपार्कनेही काही दिवसांपूर्वी २३ फुटी भव्य गणेशमुर्ती न साकरता फक्त तीन फुटाची छोटी मुर्ती घडवण्याचा निर्णय घेतला. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नेरपार्कचा गणपती परळचा राजा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी २३ फुटापर्यंत भव्य आकर्षक गणेशमुर्ती मंडळाकडून साकारण्यात येते. पण करोना संकट, आर्थिक मंदी या पार्श्वभूमीवर मंडळाने गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

खेतवाडीतही साध्या पद्धतीने साजरा होणार गणेशोत्सव
परळ, लालबाग पाठोपाठ गिरगाव खेतवाडीत गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी अखिल खेतवाडीतील गणेश मंडळे सुद्धा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. दोन फुटापासून ते पाच फुटापर्यंत छोटया मुर्ती यंदा घडवण्यात येणार असल्याचे अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मध्यस्थ मंडळाकडून सांगण्यात आले. ही खेतवाडीतील ३१ गणेशोत्सव मंडळांशी संलग्न असलेली संस्था आहे.

‘मुंबईचा राजा’ गणेशगल्ली सुद्धा वर्गणी नाही काढणार
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगल्लीने सुद्धा यंदा लोकांकडून वर्गणी न काढता गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशगल्लीचा गणपती मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी लाखो लोक गणेश गल्लीत दर्शनासाठी येत असतात. करोना व्हायरसने लोकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम केला आहे. त्यामुळे मंडळयाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा वर्गणी न काढता उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 6:26 pm

Web Title: coronavirus pandemic chinchpokli sarvajanik utsav mandal cancel ganesh arrival procession dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
2 सुशांत सिंहची मैत्रीण रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून चौकशी होणार?
3 मुंबईसह राज्यातील सर्व करोना मृत्यू दोन दिवसात जाहीर करणार- मुख्य सचिव अजोय मेहता
Just Now!
X