देशांतर्गत विमान सेवेचा आठवडा; मुंबईत परतणाऱ्यांपेक्षा बाहेर जाणाऱ्यांची संख्या अधिक

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवासात मुंबईतून बाहेर जाण्यासाठीच अधिक प्रतिसाद मिळत आहे. सात दिवसांत ३१ हजार ६६५ प्रवाशांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ‘उड्डाण’ केले असून यात एका दिवसात जाऊन मुंबईसाठी परतीचा प्रवास करणाऱ्यांचाही समावेश आहे. मुंबईतून दिल्लीसाठीच सर्वाधिक प्रवास झाला आहे. आतापर्यंत ४२ हजार ५०० प्रवाशांची मुंबई विमानतळावर ये-जा राहिली.

देशांतर्गत प्रवासाला २५ मे पासून सुरुवात झाली. मुंबई विमानतळावरून जास्तीत जास्त २५ विमानांचे उड्डाण आणि २५ विमानांच्या आगमनाची मंजुरी राज्य सरकारकडून देण्यात आली. त्यानुसार प्रवासाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत एकू ण ४७ विमानांची ये-जा झाली. मात्र मुंबईत येण्यापेक्षा मुंबईतून जाणाऱ्यांचीच अधिक गर्दी विमानतळावर होती. ३ हजार ७५२ प्रवासी विमानाने मुंबईतून बाहेर गेले. तर १,१०० प्रवाशांचे आगमन झाले. यात एका दिवसात मुंबईबाहेर जाऊन पुन्हा येणारे प्रवासीही होते.

शासनाने दिलेल्या एकू ण ५० फे ऱ्यांपर्यंत पोहोचण्यास २७ मे उजाडला. याच दिवशी प्रत्येकी २५ विमानांचे आगमन व उड्डाण झाले आणि एकू ण ४ हजार २२४ प्रवाशांची नोंद झाली. या दिवशीही मुंबईत सर्वाधिक प्रवासी दाखल झाले. या संख्येत ३१ मेपर्यंत वाढच होत आहे. तर विमान फे ऱ्यांची संख्याही ५० पर्यंत कायम राहिली आहे.

आतापर्यंत मुंबईतून ३१ हजार ६६५ प्रवासी गेले, तर मुंबईत १० हजार ८३८ प्रवासी आले. मुंबईतून जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक दिल्ली प्रवासीच आहेत. दिल्लीसाठी ८ हजार १३० प्रवासी रवाना झाले. त्यानंतर पटणा वाराणसी, भुवनेश्वरसाठीही प्रवासी गेले. मुंबई विमानतळावरून ३९१ विमान सेवांचे उड्डाण व आगमन झाले. कोलकाता आणि राजकोटसाठीही विमानसेवा सुरू झाल्या आहेत.

घरातच अलगीकरणाचा शिक्का

विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या डाव्या हातावर १४ दिवस घरातच राहण्याचा अलगीकरणाचा शिक्का मारला जात होता. जे प्रवासी एका दिवसात जाऊन पुन्हा येणार होते अशा प्रवाशांची माहिती घेऊन त्यांना अलगीकरणातून वगळण्याचा निर्णय घेतला होता. २५ मे ते ३१ मेपर्यंत एकू ण १० हजारांहून अधिक प्रवासी मुंबईत आले. मात्र यातील किती प्रवाशांवर अलगीकरणाचा शिक्का मारला हे समजू शकले नाही.

खबरदारीचे उपाय

करोनाचा फै लाव होऊ नये आणि त्याचा धोका ओळखता

यावा यासाठी मुंबई विमानतळावर सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रवासासाठी घालण्यात आलेल्या अटींनुसार विमानतळावर आलेल्या प्रवाशांनी मुखपट्टय़ा, हातमोजे घालणे गरजेचे आहे.

प्रवाशांनी सामाजिक अंतराचा नियम पाळावे यासाठी विमानतळाचे प्रवेशद्वार, उद्वहन यांसह अन्य काही ठिकाणी खुणा के ल्या आहेत. प्रवाशांना आरोग्य सेतु अ‍ॅप अनिवार्य करण्यात आले आहे.

विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना एका अर्जावर स्वत:ची संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक के ले आहे. याशिवाय प्रवाशांचे थर्मल स्क्रि निंगद्वारे तपासणीही, सॅनिटायझरची फवारणीचा वापरही केला जात होता.