मुंबई : राज्यातील करोनाचे वाढते रुग्ण आणि त्यामुळे निर्माण झालेली रेमडेसिविरची टंचाई दूर करण्यासाठी वाढीव ७० हजार इंजेक्शनची केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात रुग्णांची गरज लक्षात घेऊन रेमडेसिविरचे वाटप के ले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली.

शहरी भागात करोनावर काही प्रमाणात नियंत्रण येत असले तरी ग्रामीण भागात बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिविरच्या मागणीतही वाढ झाली आहे. राज्याची गरज लक्षात घेऊन या चार दिवसांसाठी आणखी ७० हजार इंजेक्शनची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्र सरकारकडे के ली आहे.

या इंजेक्शनच्या वाटपाचे सर्वाधिकार केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्यातच राज्यात रेमडेसिविरच्या पाटपात भेदभाव के ला जात असून वजनदान मंत्र्यांच्या जिल्ह्यात अधिक प्रमाणात रेमेडेसिविर दिली जात असल्याच्या तक्रारी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आल्या. त्याची दखल घेत जिल्हानिहाय दाखल रुग्ण आणि रेमडेसिविरची मागणी लक्षात घेऊन वाटप करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.