30 November 2020

News Flash

करोनाचं सावट! मुंबईतील शाळा आता पुढच्या वर्षीच उघडणार

महापालिका आयुक्तांचा निर्णय

संग्रहित छायाचित्र

मागील काही दिवसांपासून मुंबईत करोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार आहे.

राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील करोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढला असून, दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. मुंबईतही करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील शाळा पुढच्या वर्षीच सुरू होणार आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी, महापालिकेच्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच २३ नोव्हेंबरपासून राज्यातील इतर भागांमधील नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असले, तरी मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत. शाळांबाबत राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच वेगळा आदेश काढला होता. मुंबई महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा वापर करत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत शहरातील कोणत्याही शाळा सुरु होणार नाही, असे आदेश दिले आहेत.

“मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा २३ नोव्हेंबरला सुरू होणार नाही,” असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय आदेशात?

“बाजारपेठांमध्ये वाढलेली गर्दी आणि करोनाचा प्रादुर्भाव दिवाळीनंतर वाढण्याची शक्यता लक्षात घेता 31 डिसेंबरपर्यंत कोणतीही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आहेच, शिवाय मुंबई महापालिकेला तयारीसाठी वेळ मिळावा ही देखील त्यामागील भूमिका आहे. मुंबई महापालिकेने कोविड सेंटर म्हणून शाळा ताब्यात घेतल्या होत्या. त्यामुळे शाळांचं सॅनिटायझेशन होणं गरजेचं आहे. आता हळूहळू या सेंटरची संख्या कमी केलेली आहे. अजून अनेक शाळांचं सॅनिटायझेशन झालेलं नाही. त्यामुळे तेवढा कालावधी मिळणं हे प्रशासनासाठी गरजेचं आहे,” असं आयुक्तांनी आदेशात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:40 pm

Web Title: coronavirus school in mumbai bmc area school will remain close december bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 नितीन नांदगावकरांच्या इशाऱ्यानंतर ‘कराची स्वीट्स’ व्यवस्थापनाने उचललं ‘हे’ पाऊल
2 “भगवा तर तुम्ही तुमच्याच हातानं उतरवला, आता मुंबईकर करून दाखवतील”
3 …शिवसेनेला जनता पाताळात गाडेल, २०२२ मध्ये त्याची सुरुवात होणार – भातखळकर
Just Now!
X