करोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांच्याच जीवाशी खेळ सुरू असल्याची दुर्दैवी घटना आमदार नितेश राणे यांनी टि्वटच्या माध्यमातून समोर आणली आहे. मुंबईतील केईएम हॉस्पिटलमधील एका करोना पॉझिटिव्ह नर्सला अँब्युलन्स आणि बेड नाकारण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

अशा प्रकारची वागणूक एखाद्या नर्सला मिळणार असेल तर त्यांनी जीवाशी खेळून करोनाशी लढा द्यावा तरी कशासाठी, असा सवालही राणे यांनी केला आहे. त्यांचे टि्वट असे…

नितेश राणे यांनी या टि्वटसोबत करोना पॉझिटिव्ह आलेल्या त्या नर्सचा रिपोर्टही दिला आहे. त्यानुसार ही नर्स २६ वर्षांची असून तिला करोना झाल्याचे ३० मे रोजी निष्पन्न झाले होते.