News Flash

Coronavirus : कस्तुरबासह दहा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार उपलब्ध

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये चिंचपोकळी येथील कस्तरुबा रुग्णालयातच उपचार केले जातात.

प्रतिनिधिक छायाचित्र

दोन ते तीन दिवसांत सुविधा सुरू

मुंबई : करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना आता कस्तुरबासह जसलोक, लीलावती, एच.एन. रिलायन्स यासारख्या खासगी रुग्णालयांमध्येही उपचार घेणे शक्य होणार आहे. दहा खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू होणार असून यात ९० खाटा उपलब्ध केलेल्या आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये चिंचपोकळी येथील कस्तरुबा रुग्णालयातच उपचार केले जातात. रुग्णांची वाढती संख्या आणि गंभीर प्रकृतीच्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसनयंत्रणा इत्यादी सेवा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने या सुविधेचे विकेंद्रीकरण करण्याचा निणर्य पालिकेने घेतला आहे. दहा खासगी रुग्णालयांनी यासाठी पुढाकार घेत ९० खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्याची प्रक्रिया दोन ते तीन दिवसांत सुरू होईल, अशी माहिती पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

रुग्णालयांच्या विलगीकरण कक्षांमध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घेतली जावी, काय सेवा उपलब्ध असाव्यात, उपचार कसे द्यावेत याची मार्गदर्शक तत्त्वे या रुग्णालयांना दिलेली आहेत. यातील काही धर्मादाय रुग्णालये मोफत सेवा देणार आहेत, तर खासगी रुग्णालयांमध्ये दर आकारले जातील. किती दर आकारावेत, याबाबत अजून रुग्णालय प्रशासनाची चर्चा सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

(रुग्णालयाचे नाव आणि खाटांची संख्या)

’ जसलोक – ५

’ एच.एन.रिलायन्स  – २

’ हिंदुजा – २०

’ कोकिळाबेन  – १७

’ रहेजा  – १२

’ जगजीवन राम पश्चिम रेल्वे – १०

’ गुरुनानक – २

’ सेंट एलिझाबेथ – २

’ बॉम्बे  – ४

’ लीलावती  – १५

सेव्हन हिल्समध्येही खासगी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव

सेव्हन हिल्स रुग्णालयातही एका मजल्यावर अतिदक्षता विभागासह कृत्रिम श्वसनयंत्रणेसह सुविधा उपलब्ध करण्यासाठी खासगी रुग्णालयाचा पर्याय पालिका धुंडाळत आहे. यासाठी जसलोकसह अन्य तीन रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यावर विचार केला जात आहे. या सेवेचे व्यवस्थापनासह सर्व या रुग्णालयांकडून केले जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 4:58 am

Web Title: coronavirus treatment available in ten private hospitals including kasturba zws 70
Next Stories
1 Coronavirus outbreak :  शिकाऊ परवान्यासाठी तोंडी परीक्षा
2 Coronavirus : मुंबईतील दुकानेही दिवसाआड बंद
3 Coronavirus : दुबईत अडकलेल्या तरुणीला दिलासा
Just Now!
X