21 September 2020

News Flash

मुंबई लोकल कधी सुरु होणार? केंद्र सरकारने दिली माहिती

मुंबई लोकल सेवा सुरु होण्यासंबंधी सर्वसामान्यांमध्ये संभ्रम

संग्रहित

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असणारी मुंबई लोकल कधी सुरु होणार ? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई लोकल सुरु होण्यासंबंधी अनेक चुकीच्या बातम्या समोर येत असल्याने सर्वसामान्यांमधील संभ्रमही वाढत आहे. दरम्यान केंद्र सरकारने मुंबई लोकल अजून तरी बंदच राहणार असल्याचं सांगितलं आहे. सरकारकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे अधिकृत माहिती देण्यात आली असून नियमित प्रवासी तसंच उपनगरी रेल्वे सेवा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

केंद्र सरकार म्हणतं…
पुढील आदेश येईपर्यंत नियमित प्रवासी तसंच उपनगरीय रेल्वे सेवा बंद राहणार आहे ही बाब सर्वांच्या निदर्शनास आणू इच्छित आहोत. २३० विशेष ट्रेन सध्या धावत असून त्या सुरुच राहणार असल्याची नोंद घ्यावी.

राज्य सरकारच्या विनंतीनुसार मुंबईत सध्या मर्यादित लोकल ट्रेन धावत असून त्या सुरु राहणार आहेत. धावत असणाऱ्या विशेष ट्रेन्सवर नजर असून गरजेप्रमाणे त्यांची संख्या वाढवली जाईल. मात्र लॉकडाउनच्या आधी धावणाऱ्या सर्व नियमित प्रवासी आणि उपनगरीय रेल्वे पुढील आदेश येईपर्यंत बंद असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 6:11 pm

Web Title: coronavurus regular passenger and suburban train service to remain suspnded sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंनी हातावर बांधलं शिवबंधन
2 खासगी रुग्णालयांच्या लुटमारीला आळा घालण्यास ठाकरे सरकार असमर्थ-फडणवीस
3 राज्याला काही वेगळी अक्कल आहे का? – राज ठाकरे
Just Now!
X