17 January 2021

News Flash

भय बॉलीवूडमधले संपत आहे..

दिवाळीनंतर आघाडीच्या कलाकारांकडून चित्रीकरणाला धडाक्यात सुरुवात

सहा-सात महिने ठप्प झालेली चित्रपटसृष्टी, अजूनही पूर्णपणे न उघडलेली चित्रपटगृहे, जगभरात दुसऱ्या करोना लाटेचे भय बाजूला सारत बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांनी चित्रिकरणाला धडाक्यात सुरुवात केली.

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : सहा-सात महिने ठप्प झालेली चित्रपटसृष्टी, अजूनही पूर्णपणे न उघडलेली चित्रपटगृहे, जगभरात दुसऱ्या करोना लाटेचे भय बाजूला सारत बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांनी चित्रिकरणाला धडाक्यात सुरुवात केली. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर अक्षयकुमारचा अपवाद वगळल्यास मोठय़ा कलाकारांनी चित्रिकरणाची घाई न करण्याचा निर्धार के ला होता. मात्र, आता दिवाळीनंतर सलमान खान, शाहरूख खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग आदींनी चित्रिकरणाला आरंभ केला.

अक्षय कु मारने ऑगस्टमध्ये लंडनमध्ये ‘बेलबॉटम’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण के ले होते. सध्या तो यशराजची निर्मिती असलेला ‘पृथ्वीराज’ आणि सारा अली खान-धनुष जोडीचा आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ या दोन चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. शिवाय, जानेवारीत ‘बच्चन पांडे’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणालाही सुरुवात करणार आहे.

शाहरूख खाननेही ‘पठान’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण आरंभले आहे. यशराजची निर्मिती असलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण नायिका आहे. तब्बल तीन वर्षांनंतर शाहरूखने चित्रिकरण सुरू के ले आहे.

शाहरुखप्रमाणेच गेली काही वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर असलेला अभिनेता रणबीर कपूरही सध्या चित्रिकरणात व्यग्र आहे. गेली दोन वर्षे ‘ब्रम्हास्त्र’च्याच चित्रिकरणात रणबीरने त्याच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण के ले. सध्या तो लव्ह रंजन दिग्दर्शित नवीन चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात करणार आहे. यात पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

सलमान खानने याआधी ‘राधे’च्या उर्वरित भागाचे चित्रिकरण कर्जत आणि पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसच्या ठिकाणी पूर्ण के ले. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम’ या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या पुणे परिसरात सुरू आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘अंतिम’मध्ये सलमान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिके त दिसणार आहे. ‘८३’ आणि ‘सूर्यवंशी’ अशा दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची वाट पहात असलेल्या रणवीरनेही नव्या चित्रपटाची सुरूवात के ली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ या नव्या चित्रपटात तो आणि अभिनेता वरूण शर्मा दोघेही दुहेरी भूमिके त दिसणार आहेत. पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नाडिस या दोघी चित्रपटात रणवीरच्या नायिका आहेत. आघाडीच्या या फळीबरोबर अभिनेता विकी कौशल, सिध्दार्थ मल्होत्रा, वरूण धवन यांनीही आपापल्या नवीन चित्रपटांच्या चित्रिकरणाला सुरूवात के ली असल्याने काही काळ बंद असलेली चित्रपटसृष्टी सध्या वेगाने कामाला लागल्याचे दिसते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2020 12:49 am

Web Title: coronvirus bollywood is coming on track dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 महालक्ष्मी पुलासाठी १९९ झाडांवर कुऱ्हाड?
2 बार कौन्सिलचे नोंदणी शुल्क दुप्पट
3 शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल
Just Now!
X