ई-निविदा पद्धतीमधील त्रुटी, फेर ई-निविदा काढूनही कंत्राटदार नेमण्यात आलेले अपयश आणि पोटनिवडणुकांमुळे जारी झालेली आचारसंहिता यामुळे नगरसेवकांना प्रशासनाकडून छोटय़ा-मोठय़ा विकास कामांसाठी मिळालेला नगरसेवक निधी आणि विकास निधीची संपूर्ण रक्कम खर्च होऊ शकलेली नाही. त्यामुळे या निधीतून भविष्यात विकास कामे करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही पालिका आयुक्तांना पत्र पाठवून मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे.

गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने नगरसेवकांना आपापल्या प्रभागामध्ये काम करण्यासाठी ६० लाख रुपये नगरसेवक निधी आणि १ कोटी रुपये विकास निधी दिला होता. मात्र बहुसंख्य नगरसेवकांचा ५० टक्क्यांहून अधिक निधी खर्चच झालेला नाही. नगरसेवकांनी विविध कामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठविली होती.े प्रस्ताव तयार करुन अधिकाऱ्यांनी ई-निविदा मागविल्या होत्या. परंतु काही वेळा एकाच कंत्राटदाराने निविदा भरल्याने निविदा प्रक्रिया रद्द करावी लागली होती.

वारंवार ई-निविदा काढूनही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ही कामे रखडली. त्यातच वांद्रे विधानसभा आणि चेंबूरमधील घाटला येथील पालिकेच्या पोटनिवडणुकीमुळे आचारसंहिता जारी कवारंवार ई-निविदा काढूनही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ही कामे रखडली.रण्यात आली होती. या विविध कारणांमुळे नगरसेवक निधी व विकास निधीतून करण्यात येणारी कामे रखडली.