News Flash

‘पालिका शाळांतील टॅब खरेदीत भ्रष्टाचार’

या प्रकरणाची कसून चौकशी करावी, असे आदेश महापौरांनी दिल्यानंतर या वादावर पडदा पडला.

पालिका शाळांतील इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या टॅबच्या खरेदीत भ्रष्टाचार झाला असून व्हिडीओकॉनऐवजी बोल्ड कंपनीचे टॅब देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी पालिका सभागृहात केला. शिवसेना अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र या प्रकरणाची कसून चौकशी करावी, असे आदेश महापौरांनी दिल्यानंतर या वादावर पडदा पडला. विद्यार्थ्यांना अलीकडेच टॅबचे वितरण करण्यात आले. मात्र व्हिडीओकॉनऐवजी बोल्ड नावाच्या कंपनीकडून ते खरेदी करण्यात आले आहेत. टॅबची किंमत २,५०० रुपये असताना त्यासाठी पालिकेने २,८०० रुपये मोजल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी सभागृहात केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 5:58 am

Web Title: corruption in municipal schools tabs purchases
टॅग : Corruption
Next Stories
1 स्मार्ट सिटी मुंबईला शिवसेनेची सशर्त मंजुरी
2 ‘ब्लॉग बेंचर्स’मुळे तरुणाईला लिखाणासाठी प्रोत्साहन!
3 दुहेरी हत्याकांडप्रकरणी आणखी तिघांना अटक
Just Now!
X