20 January 2021

News Flash

सौंदर्यप्रसाधनांच्या बाजारपेठेचा रंग फिका

टाळेबंदीत सात महिने दुकान बंद राहिल्याने महिन्याला १ ते २ कोटी रुपये नुकसान झाले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| रेश्मा राईकवार, मानसी जोशी

घसघशीत सूट देऊनही फारशी विक्री नाही

मुंबई : रोजच्या रोज ओठावर चढणारा लिपस्टिकचा रंग, चेहरा उजळवणारा फाऊंडेशनचा थर, डोळे उठावदार करणारी काळीभोर काजळाची रेघ हा सगळा नित्याचा साजशृंगार करोनाकाळात टाळेबंदीमुळे बंद पडला. टाळेबंदी शिथिल झाली आणि महिलावर्ग कार्यालयात जायला लागला तरी चेहऱ्यावर मुखपट्टी आल्याने काजळाची रेघ सोडता फारसा सौंदर्यप्रसाधनांचा वापर अजूनही होत नाही आहे. गेल्या सात महिन्यांत चेहऱ्याला रंगरंगोटी करणारी ही महागडी ब्रॅण्डेड सौंदर्यप्रसाधने मागणीअभावी अक्षरश: के राच्या टोपलीत टाकण्याची वेळ वितरक, सलोन-पार्लरचे मालक, मॉलमधील सौंदर्यप्रसाधनांची मोठमोठी दुकाने यांच्यावर आली आहे. त्यातल्या त्यात त्वचेची निगा राखण्यास मदत करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांना मोठा फटका बसलेला नसला तरी अजूनही घसघशीत सूट देऊनही या बाजारपेठेला रंग चढत नसल्याची खंत या क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त के ली.

‘आम्ही वांद्रे, सांताक्रूझ, विलेपार्ले या परिसरांतील दुकानदारांना सौंदर्यप्रसाधने पुरवतो. टाळेबंदीत सात महिने दुकान बंद राहिल्याने महिन्याला १ ते २ कोटी रुपये नुकसान झाले आहे. काही सौंदर्यप्रसाधनांची अंतिम मुदत संपल्याने ती फे कून द्यावी लागली तर काही कंपनीला परत करावी लागली’, अशी माहिती मुंबईतील सौंदर्यप्रसाधनांचे वितरक राजेश शाह यांनी दिली. सनप्रोटेक्शन क्रीमला स्त्री आणि पुरुष दोघांकडूनही मागणी  असल्याने त्याचा मोठा साठा जानेवारी-फे बु्रवारीदरम्यान के ला जातो. तो तसाच पडून आहे. सनप्रोटेक्शन क्रीम, फाऊंडेशन ही उत्पादने लवकर खराब होतात. तसेच आयलाइनर, मस्कारा आदी उत्पादनेही बराच काळ वापरली नाही तर ती सुकतात. या उत्पादनांचा वापरण्याचा काळही मर्यादित असल्याने बरीचशी फे कू न द्यावी लागली, अशी माहिती ‘कलर मी क्रेझी’च्या मेकअप आर्टिस्ट हरप्रीत मनोचा यांनी दिली. पॅडीक्युअर-मॅनीक्युअर, फे शिअलसाठी काही हर्बल उत्पादने वापरली जातात. ही उत्पादनेही लवकर खराब होतात. यांचाही साठा वर्षाच्या सुरुवातीलाच जास्त के ला जातो. सध्या यातील काही वापरायोग्य उत्पादने शिल्लक आहेत. ही महागडी उत्पादने कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न के ला. तरीही ग्राहकच फिरकत नसल्याने हा माल टाकू न द्यावा लागण्याची भीती ‘स्टाइल अ‍ॅण्ड फाइल’च्या नेहा सुरडकर यांनी व्यक्त के ली.

शिथिलीकरणानंतर स्पा, ब्युटी पार्लर सुरू झाल्याने आता ७० टक्के व्यवसाय होत असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. करोनाकाळातही त्वचेबद्दल स्त्री-पुरुष दोघेही तितके च जागरूक असल्याने अनेकांनी ऑनलाइन उत्पादने मागवून घरच्या घरी उपाय के ले. या उत्पादनांना आजही जास्त मागणी असल्याने त्यांच्या व्यवसायाला २० ते २५ टक्के  इतका किरकोळ फटका बसल्याचे हरप्रीत यांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध क्रीमबरोबर वॅक्स, ब्लिच यांची मागणी आता वाढली आहे. शिवाय, नानाविध सुगंधाचे सॅनिटायझर, हँण्ड वॉश, वाफ घ्यायचे यंत्र (स्टिमर), वाइप टिश्यू यांचा खप जास्त होत असल्याचे शाह यांनी सांगितले.

लिपस्टिकच्या मागणीत घट

जानेवारी-फे ब्रुवारीपासूनच लग्नाचा मौसम, पर्यटनाचा काळ सुरू होतो. या काळात लिपस्टिक, फाऊंडेशनला जास्त मागणी असते. याच महिन्यांमध्ये अधिक साठा करून ठेवतो, तो तसाच पडून आहे. मुखपट्टी वापरावी लागत असल्याने लिपस्टिकच्या मागणीत आधीपेक्षा मोठी घट झाली असून पूर्वीपेक्षा के वळ ३० टक्के  व्यवसाय झाल्याचे नेहा सुरडकर यांनी सांगितले. लिपस्टिकपेक्षा चेहरा आणि डोळे आकर्षक दिसण्यासाठी विविध रंगीत आयलायनर, रूझ वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे व्यावसायिक पार्थ गुप्ता यांनी सांगितले. दिवाळीनिमित्ताने ‘नायका’, ‘शुगर’, ‘हुडा’, ‘लॅक्मे’, ‘मेबिलिन’ या कंपन्यांनी लिक्विड आणि मॅट या प्रकारात नवीन लिपस्टिक बाजारात आणल्या आहेत. मात्र सध्या महिलावर्गाकडून तुलनेने वापर कमी होत असल्याने नव्या उत्पादनांची विक्रीच होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लिपस्टिक लावल्यावर मुखपट्टीला रंग लागत असल्याने त्याऐवजी लिप बाम वापरण्यावर जास्त भर दिला जातो आहे, असे हरप्रीत यांनी सांगितले.

स्पा व्यवसायाला फटका

टाळेबंदीमुळे स्पा व्यवसायाचे ३० टक्क्यांनी नुकसान झाले असल्याचे ‘स्पाब्युलस स्पा’चे दत्तप्रसाद राणे यांनी सांगितले. स्पासाठी सध्या आम्हाला कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे. हे कु शल कर्मचारी बव्हंशी पूर्वांचलातून येतात. मात्र टाळेबंदीमुळे ते गावी परतले आहेत. सध्या तेवढा व्यवसायही होत नसल्याने कर्मचाऱ्यांना पुरेसे पैसे देऊन पुन्हा बोलवणे, ग्राहकांना स्पापर्यंत आणणे ही आव्हाने या व्यवसायासमोर असल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 12:53 am

Web Title: cosmetics market lipstick color face brightening foundation cover on the face mask akp 94
Next Stories
1 सौर ऊर्जेमुळे कोट्यवधींची बचत
2 देवनार कचराभूमीतील वीजनिर्मिती प्रकल्पाला हिरवा कंदील
3 अमेरिकेचे चलन विक्रीच्या नावाखाली फसवणूक
Just Now!
X