News Flash

‘सौंदर्य प्रसाधने सीलबंदच हवीत’

त्वचेशी संबंधित सौंदर्य प्रसाधने सीलबंदच असायला हवी, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त करत जनहितार्थ ही बाब कंपन्यांना बंधनकारक का केली जात नाही

| January 15, 2015 03:16 am

त्वचेशी संबंधित सौंदर्य प्रसाधने सीलबंदच असायला हवी, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त करत जनहितार्थ ही बाब कंपन्यांना बंधनकारक का केली जात नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बुधवारी केली. तसेच त्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
त्वचेशी संबंधित सौंदर्य प्रसाधने व्यवस्थित सीलबंद नसल्याने त्यामध्ये भेसळ केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी अशा उत्पादनांमुळे त्वचेचे विकार होऊ शकतात. त्यामुळे त्वचेशी संबंधित सौंदर्य प्रसाधने सीलबंद करण्याचे आदेश उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना द्यावेत, अशी मागणी गीता दत्ता यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. त्यांनी याचिकेत हिंदुस्तान लिव्हर, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या कंपन्यांना प्रतिवादी केले आहे. मागील सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने केंद्र सरकारला प्रतिवादी करण्याचे, तर हिंदुस्तान लिव्हर आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांना न्यायालयाने याचिकेवर आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते.
न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस कशा प्रकारे ही प्रसाधने सीलबंद नसतात आणि कशी ती हानीकारक ठरू शकतात हे याचिकार्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल घेत आणि हा मुद्दा गंभीर असल्याचे नमूद करीत ही प्रसाधने सीलबंद असलीच पाहिजेत, असे मत नोंदवले. तसेच सौंदर्य प्रसाधन उत्पादक परदेशी कंपन्या अन्य देशांमध्ये सीलबंद उत्पादके उपलब्ध करून देतात.
मग भारतात त्यांना काय अडचण आहे, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. तसेच केंद्र सरकारही या कंपन्यांना सीलबंद उत्पादके उपलब्ध करण्याची अट का घालत नाही, त्यांना त्यासाठी नेमकी काय अडचण आहे, अशी विचारणा करत न्यायालयाने केंद्र सरकारला त्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 3:16 am

Web Title: cosmetics should packed
Next Stories
1 ‘स्टार प्रवाह’ वाहिनीची ‘महासंक्रांत’
2 २३ हजार टंचाईग्रस्त गावांतील परीक्षा शुल्क माफ!
3 ‘विरोधी पक्ष म्हणून आक्रमक व्हा!’
Just Now!
X