प्रकल्पाची किंमत १२ हजार कोटींवर; आतापर्यंत ५०० कोटी रुपये खर्च

मुंबई  : कोस्टल रोडच्या कामासंबंधी परवानग्या नव्याने घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे कोस्टल रोडचा खर्च खूप वाढणार आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये स्थायी समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली तेव्हा या प्रकल्पाची मूळ किंमत ८५०० कोटी होती. मात्र विविध कर धरून या प्रकल्पाची एकूण किंमत १२ हजार कोटींवर गेली होती.  प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या ९.९८ किमीच्या कोस्टल रोडचे काम प्रत्यक्षात आॉक्टोबरमध्ये सुरू झाले. आतापर्यंत या कामासाठी ५०० कोटी खर्च करण्यात आले आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर ताबडतोब आज पालिकेने या प्रकल्पाचे सर्व ठिकाणावरचे काम थांबवले आहे.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

शिवसेनेचा आणि पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या प्रकल्पासाठी विविध प्राधिकरणाच्या तब्बल १८ परवानग्या घेण्यात आल्या आहेत.   सीआरझेडचे किचकट कायदे बदलण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना सामावून घेणारी लांबलचक निविदा प्रक्रिया त्याकरिता राबवण्यात आली होती. प्रिन्सेस स्ट्रीट ते बडोदा पॅलेस र्पयग्तच्या कामासाठी एलअ‍ॅण्डटी तर बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सीलिंकपर्यंतच्या कामासाठी एससीसी-एचडीसी या भागीदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी एकूण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा १३ कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या.

उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेली स्थगितीच्या काळातील खर्च आणि आता काम थांबवल्यानंतरचा खर्च धरून प्रकल्पाची किंमत शेकडो कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. कंत्राटदारानी कामाच्या ठिकाणी लावलेली यंत्रसामुग्री त्याचे भाडे याचा दावा कंत्राटदार पालिकेकडे कोटय़ावधीमध्ये करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा प्रकल्प जेवढा पुढे जाईल तसा त्याचा वार्षिक खर्चही वाढणार आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात एकाच वेळी सुरू केले होते. त्यात प्रियदर्शिनी पार्क, हाजी अली, अमरसन्स, वरळी या ठिकाणी भरावाचे काम सुरू होते. हे सगळे काम पूर्णत: थांबवण्यात आले आहे.

या आहेत १८ परवानग्या

या प्रकल्पासाठी हेरीटेज कमिटी, तटरक्षक दल, भारतीय नौसेना, हार्बर इंजिनिअर, सार्वजनिक बांधकाम विभाग, सागरी पोलिस, मुंबई मेरीटाईम बोर्ड, हाय पॉवर कमिटी,  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सागरी क्षेत्र नियमन, पर्यावरण व वन मंत्रालय, वाहतूक विभाग आदी प्राधिकरणांच्या ना हरकत प्रमाणपत्रे मिळवण्यात आली होती. तर जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेचा ताबा घेण्यात आला होता.

भाग                                                          कंपनी                                         कंत्राटाची रक्कम

प्रियदर्शिनी पार्क  ते बडोदा पॅलेस                  एलअ‍ॅण्डटी                                        ४, ३७४ कोटी

बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतू          एचसीसी-एचडीसी                            २,६५३ कोटी

प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शिनी पार्क                  एलअ‍ॅण्डटी                                       ३,४९२ कोटी