मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ  साठे महामंडळातील कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून निलंबित केलेले आमदार रमेश कदम यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यास मंगळवारी मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

कदम हे ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१४ या काळात महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळातील कोटय़वधी रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत कदम यांनी इतर सदस्यांच्या मदतीने ३०० कोटींचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले आहे. महामंडळाचा निधी वापरण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्याद्वारे मिळालेला निधी स्वत:च्या फायद्यासाठी वापरला, असेही तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी आमदार कदम यांच्यासह इतरांना अटकही करण्यात आली कोणत्याही आमदाराविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी राज्यपालांची परवानगी लागते.

कृपाशंकर यांना वेगळा न्याय?

एकीकडे आमदार रमेश कदम यांच्या विरोधात खटला दाखल करण्यास परवानगी देणाऱ्या राज्य सरकारने काँग्रेसचे नेते कृपा शंकर सिंह यांच्याबाबत मात्र वेगळी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.