मुंबई : मुंबईतील गृह विलगीकरणातील रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी  पालिकेच्या आरोग्य विभागाने आणि प्रोजेक्ट स्टेप वन या संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. निराश झालेल्या, एकटेपणा जाणवणाऱ्या गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी मदत क्रमांक तयार करण्यात आला असून अशा रुग्णांसाठी व त्यांची काळजी घेणाऱ्या नातेवाईकांसाठी आवश्यक अशी सर्व माहिती देणारी डिजिटल पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे.

मुंबईत सध्या सहा लाख ७१ हजाराहून अधिक रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. अशा रुग्णांची अचानक प्रकृती बिघडल्यास त्यांनी काय करावे, किं वा काय करू नये याची माहिती देणारी एक पुस्तिको प्रोजेक्ट स्टेप वन या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आली आहे.

गृह विलगीकरणातील रुग्णांना एकटे पाडू नये तसेच या रुग्णांनीही मोबाईल किं वा व्हिडिओ कॉलिंग द्वारे नातेवाईकांच्या संपर्कात राहावे, असे आवाहन या पुस्तिके तून करण्यात आले आहे.

मदत क्रमांक

रुग्णाला तणावयुक्त, उदास, एकटे, चिंता, काळजी  वाटत असेल तर अशा रुग्णांना मानसिक  आधारासाठी १८००-१०२-४०४० हा मदत क्रमांक देण्यात आला आहे.