News Flash

विजेच्या धक्क्याने दाम्पत्याचा मृत्यू

विजेच्या उघडय़ा तारेचा स्पर्श झाल्याने एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. सांताक्रूझच्या गजधरबंध परिसरातील चाळीत ही दुर्घटना शनिवारी घडली.

| December 28, 2014 02:39 am

विजेच्या उघडय़ा तारेचा स्पर्श झाल्याने एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. सांताक्रूझच्या गजधरबंध परिसरातील चाळीत ही दुर्घटना शनिवारी घडली. कपडे वाळत घालताना पत्नीला विजेचा धक्का लागल्यानंतर तिला वाचविण्यासाठी पतीने धाव घेतली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिल खैरे (४९) व वासंती खैरे (४०) अशी मृतांची नावे आहेत.
खैरे दाम्पत्याला दोन मुले आहेत. घरातील पोटमाळ्याच्या शिडीला लागून असलेल्या लोखंडी ग्रीलजवळ विजेची तार लटकत होती. त्या तारेचा स्पर्श ग्रीलला झाला आणि त्यातून विजेचा धक्का वासंती यांनी लागला. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून पती अनिल खैरे पत्नीला वाचवायला गेले. त्यांनाही विजेचा धक्का बसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2014 2:39 am

Web Title: couple died of electric shock
टॅग : Electric Shock
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा!
2 भिवंडीतील लाकडाच्या गोदामाला भीषण आग; आठ जणांचा मृत्यू
3 मोबाईलद्वारे रेल्वे तिकीट काढण्याच्या सेवेचे लोकार्पण!
Just Now!
X