News Flash

मरीन ड्राईव्हवर भररस्त्यात युगूलाचे अश्लिल चाळे; महिला ताब्यात, तरुण पसार

काही मंडळींनी मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार कैद केला. युगूलाचे चाळे सुरु होताच काही मिनिटांमध्येच तिथे पोलिसांचे गस्ती पथक पोहोचले आणि ....

मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे एका युगूलाने रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर बसून अश्लिल चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणात पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे. तर महिलेसोबत अश्लिल चाळे करणारा तरुण हा परदेशी असून त्याचा शोध सुरु आहे.

शुक्रवारी सकाळी मरीन ड्राईव्ह येथे रस्त्यामधील दुभाजकावर बसून एक युगूल अश्लिल चाळे करत होते. मरीन ड्राईव्हला समुद्र किनारी प्रेमी युगूल अनेकदा दिसतात. पण रस्त्याच्या मधोमध हा प्रकार सुरु असल्याने उपस्थितांचे लक्ष त्या युगूलाकडे वेधले जात होते. काही मंडळींनी मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार कैद केला. युगूलाचे चाळे सुरु होताच काही मिनिटांमध्येच तिथे पोलिसांचे गस्ती पथक पोहोचले. पोलिसांना बघून त्या युगूलाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तर तिच्यासोबत अश्लिल चाळे करणारा परदेशी तरुण तिथून पळून गेला.

महिलेला मानसिक आजार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. महिला पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळत होती. सुरुवातीला तिने गोव्यातून आल्याचे सांगितले. मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला. पण महिलेबाबत माहिती मिळू शकली नाही. तिचे वागणे आणि बोलणे विचित्र असून तिला मानसिक आजार असावा, असे अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. महिलेची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या परदेशी तरुणाचाही पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 2:30 pm

Web Title: couple indecent behaviour on road divider at marine drive video viral woman held lookout for foreigner
Next Stories
1 Mumbai monsoon updates: अतिपावसामुळे मुंबई तुंबली; महापालिकेचे स्पष्टीकरण
2 बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी, आरपार राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय? – उद्धव ठाकरे
3 मुंबई – फोर्ट परिसरातील इमारतीमध्ये भीषण आग, १८ गाड्या घटनास्थळी
Just Now!
X